लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम व नक्षलग्रस्त भागात बेस कॅम्पपासून मतदान केंद्रापर्यंतचा काही किलोमीटरचा प्रवास मतदान कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) पोलिसांच्या संरक्षणात पायदळच करावा लागला. त्यामुळे त्या पोलिंग पार्ट्यांचे चांगलेच हाल झाले. उन्हात एवढे पायी चालण्याची सवय नसल्यामुळे त्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास निम्मे मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रावरील पोलिंग पार्ट्यांना बेस कॅम्पपर्यंत हेलिकॉप्टर किंवा वाहनाने पोहोचविले जात आहे. दुर्गम भागातील अनेक गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. तसेच ही गावे नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्याने वाहनाचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा गावांना जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्यास पोलीस विभागाकडून प्रतिबंध घालण्यात आल्या आहेत. परिणामी पोलिंग पार्टीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलिसांच्या संरक्षणात पायदळच नेले जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी ठरविलेल्या मार्गानेच जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना फार दूर चालण्याची सवय राहत नाही. अशातच एकाच दिवशी १५ ते २० किमी अंतर पायी जावे लागत आहे. सोबतच निवडणुकीच्या साहित्याचा ओझाही न्यावा लागत आहेत. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वीच पोलिंग पार्ट्या तालुकास्तरावरून रवाना करण्यात आल्या. सततचा प्रवास, झोप न होणे, पाण्यातील बदल यामुळे कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.४० च्या आतील कर्मचाऱ्यांची दुर्गम भागात नेमणूकदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर पायी जावे लागते. किमान दोन दिवस मुक्काम ठोकावा लागतो. ही बाब निवडणूक विभागाला माहित असल्याने दुर्गम भागातील मतदान केंद्रांच्या पोलिंग पार्टीमध्ये वयाने ४० वर्षापेक्षा कमी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. चालून थकलेले कर्मचारी एखाद्या झाडाखाली किंवा रस्त्यावरच आराम करीत असल्याचे फोटो फेसबूक, व्हॉटस्अॅपवर व्हायरल होत आहेत.
Lok Sabha Election 2019; मतदान कर्मचाऱ्यांची पायदळ वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:00 IST
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात बेस कॅम्पपासून मतदान केंद्रापर्यंतचा काही किलोमीटरचा प्रवास मतदान कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) पोलिसांच्या संरक्षणात पायदळच करावा लागला. त्यामुळे त्या पोलिंग पार्ट्यांचे चांगलेच हाल झाले. उन्हात एवढे पायी चालण्याची सवय नसल्यामुळे त्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
Lok Sabha Election 2019; मतदान कर्मचाऱ्यांची पायदळ वारी
ठळक मुद्देसवय नसल्याने हाल : पोलिसांच्या संरक्षणात मतदान केंद्रांच्या गावाकडे मार्गक्रमण