शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; गडचिरोली जिल्ह्यातील १५ गावांत होणार दारूमुक्त निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:34 IST

निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुक्यातील लोकांचा निर्धार गावात दारूचा वापर होऊ न देण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली  : गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले आहेत. ती टिकवून ठेवण्यासाठीही आमची धडपड सुरु आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे. दारूला गावात येऊच देणार नाही, असा निर्धारही महिलांनी व्यक्त केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक प्रयत्न केले जात आहे. अनेक गावांनी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून गावात ठराव घेऊन दारूविक्री बंद केली आहे. ती तशीच टिकून राहावी यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारादरम्यान मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत मिळविण्याचा प्रकार उमेदवारांकडून तसेच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घडू शकतो. यासाठीच ही निवडणूक दारूमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देसाईगंज तालुक्यात आतापर्यंत कोकडी, उसेगाव, कसारी, कुरुड, झरी-फरी, किन्हाळा, विहीरगाव, पिंपळगाव, शिवराजपूर शंकरपूर, रावणवाडी, आमगाव, सावंगी, एकलपूर आणि नवीन लाडज या गावांनी सभा घेऊन निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव घेतला आहे.गावाच्या विकासासाठी चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांची गरज आहे. तो नेता निवडण्यासाठी शुद्धीत राहून मतदान करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे दारूच्या अमिषाला बळी न पडता लोकशाहीचा अधिकार वापरणार असल्याचे मत लोकांनी व्यक्त केले आहे. बैठकीला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.महिलांचा पुढाकारदारूमुक्त गाव संघटनेत महिलांचा पुढाकार आहे. खास करून बचत गटाच्या माध्यमातून संघटीत झालेल्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सहभाग घेत आहेत. याच महिला दारूमुक्त निवडणुकीसाठी जोरात प्रयत्न करीत आहे. नवरा दारू पितो व त्याचा त्रास आम्हा महिलांनाच होतो. त्यामुळे गावात टिकवून ठेवलेली दारूबंदी निवडणूक काळात सुरु होऊ देणार नाही, असा निर्धार गावागावात महिला व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019