शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; उमेदवारांनी शोधली प्रचाराची नवीन शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:24 IST

लोकसभेच्या मतदानाला अवघे आठ-दहा दिवस उरलेले असले तरी निवडणूक प्रचाराला रंगत चढलेली नसल्याने मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. काही उमेदवारांनी नवीन शक्कल लढवून प्रचारासाठी काही विशेष कार्यकर्ते (प्रचारक) नियुक्त केलेले आहेत. हे कार्यकर्ते पान टपरी, चौक व ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती गप्पा मारत बसले असतात त्याठिकाणी जाऊन आपल्या उमेदवाराबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणत आहेत.

ठळक मुद्देचर्चेतून मतपरिवर्तनाचा फंडा : चारचौघात जाऊन करताहेत सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या मतदानाला अवघे आठ-दहा दिवस उरलेले असले तरी निवडणूक प्रचाराला रंगत चढलेली नसल्याने मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. काही उमेदवारांनी नवीन शक्कल लढवून प्रचारासाठी काही विशेष कार्यकर्ते (प्रचारक) नियुक्त केलेले आहेत. हे कार्यकर्ते पान टपरी, चौक व ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती गप्पा मारत बसले असतात त्याठिकाणी जाऊन आपल्या उमेदवाराबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणत आहेत.सरळ प्रचार करण्याऐवजी एखाद्या विषयाला वळवून चर्चा निवडणुकीपर्यंत नेऊन पोहोचविणे व नंतर विरोधी उमेदवार लायकीचा कसा नाही व तो कमजोर कसा आहे हे पटवून सांगून आपला उमेदवार सरस कसा आहे हे पटवून देण्यात हे कार्यकर्ते तरबेज ठरत आहेत, यावरून या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे की काय? असाच भास त्यांच्या चर्चेवरून होतो.सध्या उपहारगृहे, भोजनालय, गावाबाहेरील धाबे यांना सुगीचे दिवस आलेले आहे. दररोज सायंकाळी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष पदाधिकारी व कार्यकर्ते हे आपल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था वरील ठिकाणी करीत आहेत. दिवसभर प्रचार व रात्री जेवण हा नित्यक्रम आता दररोज पहायला मिळत आहे.विशेष कार्यकर्त्यांकडून ब्रेन वॉश झालेले उपस्थित नागरीक मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तेच बोलतात जे त्या विशेष प्रचारकांनी त्यांना सांगितलेले असते. यामुळे आपोआपच विनापैशाने त्यांचा प्रचार होत असतो. उमेदवारांनी लढविलेली ही नवीन शक्कल चांगली उपयोगी ठरणार आहे.या प्रकारच्या विशेष प्रचारकांचे अनेक पथक तयार करण्यात आले असून एका पथकात तीन ते चार प्रचारकांचा समावेश आहे. हे प्रचारक एका ठराविक मानधनावर कार्य करीत असल्याचे समजते. प्रत्येक मोठ्या गावात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्ननिवडणुकीत एक नवीनच फंडा अंमलात आणण्यात आला आहे आणि तो म्हणजे एखाद्या ठिकाणी बसून विशेष कार्यकर्त्यांद्वारे लोकांची मने वळविणे. हे विशेष प्रशिक्षित कार्यकर्ते ज्या ठिकाणी चार-पाच व्यक्ती एकत्र बसलेले असतात त्याठिकाणी जातात व विषयाला थेट हात न घालता हळूहळू अन्य विरोधी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या कार्याची चर्चा करून त्या अनुषंगाने उमेदवाराचा विषय छेडला जातो. आपल्या उमेदवाराची महत्ता सांगण्यास सुरुवात करून तेथे उपस्थित लोकांचे 'ब्रेन वॉश' करण्याचा प्रयत्न करतात. प्रचाराचे हे नवीन तंत्र प्रमुख राष्टÑीय पक्षांकडून अवलंबिले जात आहे.