शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; दुर्गम भागापासून उमेदवार दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:43 IST

गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्दे५०० किमीचा विस्तार : लोक विचारतात, उमेदवार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विस्तार सिरोंचा तालुक्यापासून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापर्यंत ५०० किमीच्या घरात आहे. प्रत्येक गावात उमेदवाराला पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते पोहोचतील, याची व्यवस्था केली जात आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील काही विधानसभा क्षेत्र दुर्गम भागात मोडतात. त्या भागात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. चार ते पाच किमी अंतरावर ९ ते १० कुटुंबाची लोकसंख्या असलेले गाव आढळते. त्याचबरोबर काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे त्या गावांना भेट देण्यापेक्षा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देण्यास प्राधान्य दिले जात आहे. या क्षेत्रांमध्ये दर दोन ते तीन किमी अंतरावर १०० ते २०० कुटुंबांची लोकसंख्या असलेले गाव मिळते. या गावांमध्ये पोहोचून प्रचार केल्यास कमी कालावधीत जास्त लोकांकडे पोहोचता येते. प्रचाराच्या या गणितात गडचिरोली जिल्हा मागे पडला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करून संबंधित गावांमध्ये फिरण्याचे निर्देश उमेदवार देत आहेत.दुर्गम भागातील काही गावांमध्ये वृत्तपत्र पोहोचत नाही. त्यामुळे नेमका कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, हे त्यांना सुध्दा माहीत नाही. त्यामुळे ऐनवेळेवर कोणत्याही उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर्षी तरी उमेदवार आपल्या गावांपर्यंत पोहोचून आपल्या समस्या जाणून घेतील, अशी अपेक्षा दुर्गम भागातील नागरिकांना होते. मात्र आता प्रचारासाठी केवळ आठ ते नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दुर्गम गावांपर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.समस्यांच्या पाढ्यांनी कार्यकर्ते निरूत्तरज्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्या गावात इतर सोयीसुविधा असतील काय? याचा विचार न केलेलाच बरा. अशा गावांमध्ये उमेदवार पोहोचू शकत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रचार करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. कार्यकर्ता गावात मत मागण्यासाठी गेल्यानंतर त्याला गावातील समस्यांचा पाढा वाचवून दाखविला जात आहे. पाच वर्ष उलटूनही निवडून आलेले लोक आमच्या गावाला येत नाही. त्यांचे तर सोडाच मतदानाचा दिवस उलटल्यानंतर तुम्ही कार्यकर्तेही आमच्या गावाकडे फिरकून बघत नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावकऱ्यांचे प्रश्न बघून नेमके कोणते उत्तर द्यावे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.कोण आहे उमेदवार?छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसंख्या विरळ असल्याने उमेदवार या गावांमध्ये प्रचार करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावापर्यंत पोहोचत नाही. अनेक गावातील नागरिकांना आपल्या भागात लोकसभेचे उमेदवार कोण-कोण रिंगणात आहेत, हे सुध्दा माहित नसल्याची स्थिती आहे.