शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; वरिष्ठांच्या बुस्टरनंतर ‘हम साथ-साथ है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:46 IST

लोकसभेच्या रिंगणात एकूण ५ राजकीय पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढतीमधील उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. या सभांमध्ये आता वरिष्ठ नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून उमेदवारांसोबत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते बसत असल्यामुळे ‘हम साथ साथ है’चे दृष्य पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देएकी दाखविण्यासाठी धडपड : नेत्यांच्या प्रचार सभांमध्ये मंचावर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या रिंगणात एकूण ५ राजकीय पक्षांचे उमेदवार असले तरी मुख्य लढतीमधील उमेदवारांसाठी नेत्यांच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. या सभांमध्ये आता वरिष्ठ नेत्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून उमेदवारांसोबत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते बसत असल्यामुळे ‘हम साथ साथ है’चे दृष्य पहायला मिळत आहे.काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा सस्पेन्स दूर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी नाराजी होती. त्यामुळे सुरूवातीला त्यांचा प्रचारातील सहभागही नगण्य होता. परंतू नंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना ‘बुस्टर डोज’ देत कामी लागण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता नेत्यांच्या प्रचारसभांपासून तर गावोगावच्या प्रचारातही त्यांचा सहभाग वाढला आहे.मतदार संघातील ६ पैकी ५ आमदार भाजपचे आहेत. आपापल्या क्षेत्रात पक्षाच्या उमेदवाला मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्यामुळे ते कामाला लागले आहेत. डॉ.देवराव होळी यांनी तर प्रसिद्धी पत्रक काढून आपण उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हतो, पक्षाकडूनच विचारणा झाली होती, असे सांगून आपण एकदिलाने कामाला लागल्याचे स्पष्ट केले. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची सत्ता असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे भाजप-सेनेत ताणलेल्या संबंधानंतर शेवटच्या टप्प्यात झालेली युती कितपत फायदेशिर ठरेल? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. परंतू युती धर्म पाळत शिवसेनेचे पदाधिकारी कामी लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.काँग्रेस आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा दक्षिण गडचिरोलीतील प्रचार सभांमध्ये भाग घेत आहेत. रविवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारसभांमध्ये ते सोबत होते. परंतू इतर भागात काँग्रेसला अजूनही नेत्यांची अपेक्षित साथ मिळालेली नाही.सोशल मीडियाचा वापर कमीचयावेळी प्रचारात सोशल मिडियाचा वापर अधिक प्रभावी ठरेल, असे चित्र दिसत होते. मात्र जिल्ह्यात सोशल मिडियाचा वापर अजूनही मर्यादित स्वरूपातच होत आहे. नेत्यांच्या होणाऱ्या प्रचार सभा किंवा झालेल्या प्रचार सभांची माहिती देण्यापलीकडे सोशय मिडियाचा वापर होताना दिसत नाही. उमेदवारांची प्रतिमा उजळणाºया किंवा निवडून आल्यास करणार असलेल्या कामांच्या आश्वासनांच्या पोस्टही अद्याप दिसत नाही.भाजपच्या दिमतीला नागपूरची फौजमतदार संघात भाजपच्या प्रचाराचे नियोजन आणि नियंत्रणासाठी नागपूरवरून खास कार्यकर्त्यांची फौज गडचिरोलीत डेरेदाखल झाली आहे. प्रचाराच्या नियोजनात मार्गदर्शन करण्यासोबतच प्रचार यंत्रणेवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचार यंत्रणेत इतर पक्षांच्या तुलनेत अधिक सुसूत्रता दिसून येत आहे. काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत या गोष्टींचा अभाव दिसत असल्याने कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे त्यांना अवघड झाले आहे.आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखलगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात प्रशासनाने आतापर्यंत पाच गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये दारूसाठा व रोख रक्कम बाळगणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासन दक्ष असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.