शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

येमली शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:37 IST

एटापल्ली तालुक्यातील येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात दोनदा पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती.

ठळक मुद्देमुख्याध्यापकावर कारवाईची मागणी : निवेदन देऊनही चौकशी न झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात दोनदा पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती. परंतु मुख्याध्यापकाची चौैकशी करण्यात आली नाही. तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले.येमली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात ४ आॅक्टोबर २०१६ व ७ सप्टेंबर २०१७ ला पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती. परंतु मुख्याध्यापकांची कुठलीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. नागरिकांनी प्रथम पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाºयांना शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजेच शनिवारी गटशिक्षणाधिकारी, बुर्गीचे केंद्रप्रमुख यांच्या समक्ष ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. याप्रसंगी ग्रामस्थांनी अधिकाºयांच्या भूमिकेबद्दलही तीव्र रोष व्यक्त केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव हिचामी, उपाध्यक्ष जगपती गावडे, सदस्य रामजी कत्तीराव, रामा तुमरेडी, पुनेश्वर खोब्रागडे, सुधाकर दुर्गे, सावजी मडावी, दौलत गावडे, चंदू मडावी, घासी मडावी, वच्छला आत्राम, सुरेखा गावडे, कमली तलांडी, विमल पुंगाटी, सुरेंद्र मडावी, राजू हिचामी उपस्थित होते.मुख्याध्यापकाची बदली करायेमली जि. प. शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी करण्यासंदर्भात पंचायत समितीला दोनदा तक्रारी देण्यात आला. परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई होऊन त्यांची बदली होत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आता प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा आहे.