शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पलसगड ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:36 IST

सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन सरपंचावर कारवाई करावी, ....

ठळक मुद्देशेकडो नागरिकांनी पलसगड गटग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन सरपंचावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शेकडो नागरिकांनी पलसगड गटग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले.स्वातंत्र्यदिनी पलसगड गटग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दादाजी कसारे, ईश्वर मेश्राम व रवींद्र पुराम यांनी तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून सरपंच उमाजी धुर्वे यांनी १ लाख ९० हजार रुपये परस्पर घेऊन स्वस्त दरात कंत्राट देऊन भ्रष्टाचार केला व त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप केला होता. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी थेट ग्रामसभेतूनच विश्वनाथ तुलावी यांच्या मोबाईलचे स्पिकर आॅन करून तेंदूपत्ता कंपनीचे मॅनेजर पारधी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सरपंच धुर्वे यांना रक्कम दिल्याचे कबूल केले व गरज पडल्यास कोणत्याही कोर्टात कबुली देण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसभेने सरपंचास विचारणा केली असता सरपंच उमाजी धुर्वे यांनी रक्कम घेतल्याची कबुली दिली. मात्र ग्रामसभेकडून रकमेची मागणी होताच सरपंच धुर्वे हे ग्रामसदस्याना दमदाटी करू लागले. यामुळे सरपंच उमाजी धुर्वे यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन गावकºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले होते. परंतु कारवाई न झाल्याने ग्रामवासीयांनी पलसगड गटग्रामपंचायतीस टाळे ठोकले. याप्रसंगी पलसगड गटग्रामपंचायतींतर्गत गावांतील सुमारे तिनशे नागरिक उपस्थित होते. याबाबतची माहिती मिळताच बीडीओ मरसकोल्हे पलसगड येथे पोहचले. त्यांनी संतप्त गावकºयांशी चर्चा केली. त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुलूप उघडण्यात आले.