शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तरूण गटातील केवळ ७४ उद्योगांना कर्ज

By admin | Updated: September 28, 2016 02:28 IST

उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने मागील वर्षीपासून मुद्रा योजना सुरू केली आहे.

मुद्रा योजनेला अल्प प्रतिसाद : शेकडो अर्ज बँकांमध्ये पडूनगडचिरोली : उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने मागील वर्षीपासून मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातील तरूण गटात मोडणाऱ्या केवळ ७४ उद्योगांना ६ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष आग्रही असले तरी बँका मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. उद्योग उभारणे व तो चालविण्याच्या कामात भांडवल ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. उद्योग निर्मितीसाठी लाखो रूपयांचा खर्च येत असल्याने एखाद्या बेरोजगार युवकाची उद्योग उभारण्याची इच्छा असुनही तो पैशाअभावी उद्योग उभारू शकत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान केंद्र शासनाने मागील वर्षी संपूर्ण देशात मुद्रा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत उद्योगाची स्थिती वार्षिक उलाढाल लक्षात घेऊन त्याला कर्ज देणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सुध्दा देण्यात आले आहे. मात्र बँक प्रशासन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात स्टेट बँक आॅफ इंडियाने तरूण गटातील ३९ उद्योगांना ३ कोटी ४२ लाख, बँक आॅफ महाराष्ट्राने दोन उद्योगांना १२ लाख, युनियन बँक आॅफ इंडियाने एका उद्योगाला ५.५ लाख, कॅनरा बँकेने एका उद्योगाला सहा लाख, आयडीबीआय बँकेने चार उद्योगांना ४० लाख व बँक आॅफ इंडियाने २७ उद्योगांना २ कोटी २० लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. शिशू गटातील उद्योगांना ५० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जिल्हाभरातील १ हजार ९२८ उद्योगांना ८ कोटी ३७ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. किशोर गटातील ३१३ उद्योगांना ६ कोटी ९८ लाख रूपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. किशोर व शिशू गटातील उद्योजकांना सुध्दा कर्जासाठी बँकांचे वेळोवेळी उंबरठे झिजजावे लागत आहेत. त्यामुळे उद्योजक त्रस्त आहेत. सिरोंचा भागात काही राजकीय कार्यकर्त्यांनाच बँकांकडून कर्ज वितरणासाठी दबाव आणण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.बँकांवर कोणताही दबाव नाहीउद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्र, स्वयंरोजगार केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळाची आहे. या विभागांकडे कर्जासाठी अर्ज केल्यानंतर या विभागाचे अधिकारी बँकेकडे स्वत: पाठपुरावा करतात. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी सुध्दा हस्तक्षेप करून कर्ज देण्यास भाग पाडले जाते. मात्र मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांवर कोणाचाही दबाव नाही. कर्जदाराला स्वत:च बँकेमध्ये जावे लागते. अशावेळी बँका विविध कारणे सांगून अर्जदाराची दिशाभूल करतात व कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.