शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मदतीने गरोदर मातेला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:24 IST

तालुक्यातील आसावंडी येथील गरोदर माता सिंधू सुधाकर वड्डे हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. तिला कोटमी येथील उपकेंद्रात

आसावंडीच्या महिलेची कसनसुरात प्रसुती : कोटमीत पोहोचली रूग्णवाहिकालोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील आसावंडी येथील गरोदर माता सिंधू सुधाकर वड्डे हिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. तिला कोटमी येथील उपकेंद्रात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टर नसल्याने पोलिसांनी कसनसूर येथील रूग्णवाहिका बोलावून तिला कसनसूर येथे तत्काळ भरती केले. कसनसूर येथे सिंधूची प्रसुती झाली. सिंधू वड्डे ही सहा महिन्यांची गरोदर होती. १४ जुलै रोजी अचानक तिला उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ती अशक्त होऊन बेशुध्द झाली. आसावंडीतील ग्रामस्थांनी तिला खाटेवर टाकून आरोग्य उपकेंद्र कोटमी येथे भरती केले. या ठिकाणी परिचारिका हलामी व बोरकर उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक उपचार सुध्दा केले. मात्र या ठिकाणचे डॉक्टर नव्हते. त्यामुळे सदर महिलेला प्रसुतीसाठी कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करणे आवश्यक होते. कोटमी येथे एकही चारचाकी वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सिंधूला कसनसूर येथे न्यायचे कसे, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबतची माहिती कोटमी पोलीस मदत केंद्राचे पोळ यांना दिली असता, त्यांनी उपपोलीस स्टेशन कसनसूर येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व कोटमी येथे डॉक्टर व रूग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. कसनसूर येथून डॉक्टर साबने हे रूग्णवाहिका घेऊन कोटमी येथे आले. तिला रूग्णवाहिकेने कसनसूर येथे नेल्यानंतर प्रसुती केली. मात्र बाळ कमी दिवसाचे असल्याने त्याला वाचविण्यात यश आले नाही. प्रसूत माता मात्र सुखरूप आहे. कोटमी आरोग्य उपकेंद्राला पूर्णवेळ डॉक्टर देण्याची मागणी आहे. या उपकेंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने दुर्गम भागातून उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे हाल होत आहेत.नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना इतर कामातही मदत करण्याचे काम कोटमी पोलीस मदत केंद्रातील पोलीस जवान व पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.