शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

साक्षर भारत अभियान : हजारो नागरिक झाले साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:23 IST

साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.निरक्षर व्यक्तीला दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, एवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिकाला सुध्दा वाचता, लिहिता यावे, यासाठी भारत सरकारने ‘साक्षर भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरक नेमण्यात आले आहेत. सदर प्रेरक गावातील नागरिकांना शिकविण्याचे काम करतात. या प्रेरकांना मासिक दोन हजार रूपये मानधन शासनाकडून दिले जाते. मार्च व आॅगस्ट महिन्यात वर्षातून दोन वेळा दरवर्षी निरक्षरांची परीक्षा घेतली जाते.यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हाभरातील ७ हजार ३४७ नागरिकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७ हजार १५९ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर पेपर तपासणीसाठी डायटकडे पाठविण्यात आले आहेत. डायट स्तरावर या प्रश्नपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर प्रत्येक परीक्षार्थीला पडलेले गुण जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागाकडे तपासण्यासाठी पाठविले जातात. सदर गुण पुणे येथे पाठविले जातात. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना साक्षर भारत अभियान अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. गडचिरोली जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जवळपास अडीच लाख नागरिक अजुनही निरक्षर आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीनंतरही साक्षर भारत मिशन अंतर्गत परीक्षा देणाºया परीक्षार्थींची संख्या कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.सात वर्षांत सव्वा लाख नागरिकांची परीक्षामागील सात वर्षांत १ लाख ११ नागरिकांनी परीक्षा देऊन साक्षर होण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी ८ ते १० हजार नागरिक परीक्षा देतात. निरंतर शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये ११ हजार ४०५ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. २०१२ मध्ये १० हजार ९८४, २०१३ मध्ये २० हजार ४९७, २०१४ मध्ये ६ हजार १५१, २०१५ मध्ये १३ हजार ४३५, २०१६ मध्ये २९ हजार ५६० नागरिकांनी परीक्षा दिली आहे. मार्च २०१७ मध्ये २१ हजार ४७९ नागरिकांनी साक्षरतेची परीक्षा दिली आहे.

प्रेरक नावापुरतेचप्रत्येक प्रेरकाला दोन हजार रूपये मानधन दिले जात आहे. मात्र प्रेरक नागरिकानां न शिकविताच केवळ मानधन लाटत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत.तालुकानिहाय परीक्षार्थीतालुका परीक्षार्थीगडचिरोली ५५७धानोरा ९९०आरमोरी ६२३देसाईगंज ३९४कुरखेडा ७६३कोरची ५२४चामोर्शी ११३६मुलचेरा २९४एटापल्ली ४८६भामरागड २०७अहेरी ५६७सिरोंचा ६१८एकूण ७१५९