शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यादी लाखाेची; उद्दिष्ट मात्र अठराशे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. ‘अ’ व ‘ब’ यादीतील बहुतांश लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आहेत. चार वर्षांपूर्वी ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली हाेती. त्यावेळी घरकुलासाठी इच्छुक असलेल्यांची नावे मागविण्यात आली हाेती. चार वर्षांनंतर परिस्थिती बदलल्याने या यादीत बदल करणे आवश्यक असल्याने नुकत्याच प्रत्येक गावांत ग्रामसभा घेऊन यादी अंतिम तयार करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत लाभार्थ्यांची संख्या लाखाेंच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याला वर्षभरात केवळ १ हजार ८२८ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक जणांना पुन्हा पाच वर्षे घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. ‘अ’ व ‘ब’ यादीतील बहुतांश लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आहेत. चार वर्षांपूर्वी ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली हाेती. त्यावेळी घरकुलासाठी इच्छुक असलेल्यांची नावे मागविण्यात आली हाेती. चार वर्षांनंतर परिस्थिती बदलल्याने या यादीत बदल करणे आवश्यक असल्याने नुकत्याच प्रत्येक गावांत ग्रामसभा घेऊन यादी अंतिम तयार करण्यात आली आहे. यादीतील पात्र लाभार्थ्यांची संख्या लाखाेंच्या घरात राहण्याची शक्यता आहे. मात्र दरवर्षी शासन जिल्हाभरात जेमतेम दाेन हजार घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे अनेकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

२०२२ सुरू तरी ८० टक्के कच्ची घरे२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घाेषणा प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांनी केली हाेती. घरकुलाच्या याेजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधानमंत्री आवास याेजना सुरू करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत २० टक्केही नागरिकांना पक्के घरे मिळाली नाही. ग्रामीण भागांत ८० टक्के घरे कुडामातीची दिसून येतात. 

यादीत नाव असले तरी पाच वर्षकाेणत्या कुटुंबाला प्राधान्याने घरकुल द्यायचे याचे नियम शासनाने ठरवून दिले आहेत. त्यामुळे ‘ड’ यादीत नाव आहे म्हणजे, याचवर्षी घरकुल मिळणार, असे नाही. यादीत जर शेवटचे नाव असेल तर घरकुल मिळण्यासाठी आणखी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असा आहे प्राधान्य क्रमविधवा, अपंग, परित्यक्त्या व ज्या कुटुंबात सर्वाधिक सदस्य आहेत अशा कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर इतरांचा क्रमांक लागेल.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना