शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा व आष्टीतील बँक ग्राहकांना लिंकफेलचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती ...

ठळक मुद्देदिवसभर केली प्रतीक्षा । ५० किमी अंतरावरून आलेल्या ग्राहकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना बँकेत ताटकळत बसावे लागले.धानोरा येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिक याच बँकेत येत असल्याने या बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी राहते. शुक्रवारी सकाळपासूनच बँकेची लिंक फेल असल्याने कोणतेच व्यवहार दिवसभर झाले नाही. लिंक येईल व आर्थिक व्यवहार सुरू होतील, या अपेक्षेने ग्राहक दिवसभर थांबले. मात्र लिंक सुरू झाली नाही. आर्थिक व्यवहारही झाले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. काही नागरिक पीक कर्जाचे पैसे व इतर कामासाठी बँकेत आले होते. मात्र काम न झाल्याने आल्यापावली परत जावे लागले. एसबीआयचे एटीएम मागील तीन दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागत आहे. बँकही काम करीत नसल्याने नागरिक निराश झाले. पेंढरी, कोटगूल, गोडलवाही, मुंगनेर, झाडापापडा या ग्रामीण भागातून अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी आले होते. काही नागरिक केवायसी फार्म भरणे व इतर कामासाठी थांबले होते. ४० ते ५० किमी वरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.धानोरा तालुक्यात बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे ५० ते ६० किमी अंतरावरून नागरिकांना बँक व्यवहारांसाठी धानोरा येथे यावे लागते. विविध योजनांचे पैसे बँकेत जमा केले जातात. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी धानोरा येथे आल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र लिंक फेल व इतर कारणांमुळे नागरिकांची बँकेची कामे होत नाही.आष्टीतील ग्राहक आल्यापावली रिकाम्या हाताने परतलेचामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मोठे व मध्यवर्ती गाव आहे. अनेकांचे बँक खाते येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. शुक्रवारी पैसे काढण्यासाठी बँकेत मोठी गर्दी झाली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी, पगारदार वर्ग यांची बँकेत गर्दी होती. मात्र लिंक फेल राहत असल्याने आर्थिक व्यवहार होत नसल्याचा अनुभव अनेकवेळा नागरिकांना येतो. पैसे खर्च करून बसने आलेल्या वृध्द नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :bankबँक