शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार ६१० रूग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 01:19 IST

गंभीर स्थितीतील रूग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रूग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.

चार वर्षांत : १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवागडचिरोली : गंभीर स्थितीतील रूग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रूग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रूग्णवाहिकेने मागील चार वर्षात सुमारे १० हजार ६१० रूग्णांना रूग्णालयात पोहोचवून त्यांना जीवनदान मिळवून दिले आहे. वाढलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रूग्णाला उपचार मिळाल्यास सदर रूग्ण बचावण्याची शक्यता राहते. त्यामुळे या कालावधीला वैद्यकीय क्षेत्रात ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. मात्र रूग्णाला वेळेवर रूग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी वेळेवर रूग्णालयात दाखल करणे, अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रूग्णाला रूग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने १०८ ही रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा ग्रामीण रूग्णालय, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालय, अहेरी उपजिल्हा रूग्णालय, सिरोंचा ग्रामीण रूग्णालय, कोरची ग्रामीण रूग्णालय, भामरागड ग्रामीण रूग्णालय, एटापल्ली ग्रामीण रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात दोन अशा एकूण आठ रूग्णवाहिका सात ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यापासून ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुमारे १० हजार ६०० रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहेत. एकट्या आॅक्टोबर महिन्यात ६५० रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. शासनाच्या या योजनेमुळे अनेक नागरिकांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन गावांमधील अंतर अधिक आहे. त्याचबरोबर लोकसंख्या विरळ आहे. दुचाकी वाहनांची संख्या कमी आहे. अशातच रूग्णाला वेळेवर चारचाकी वाहन उपलब्ध होणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे १०८ क्रमांकाची सेवा नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. विशेष म्हणजे, या रूग्णवाहिकेत एक डॉक्टर उपलब्ध राहतो. त्यामुळे रूग्णाला रूग्णालयात दाखल करतेवेळी जरी काही समस्या निर्माण झाल्यास त्याला डॉक्टरांकडून वेळीच उपचार मिळतात. त्याचबरोबर या रूग्णवाहिकेत अत्यावश्यक सोयीसुविधाही उपलब्ध होत असल्याने याचा लाभ रूग्णाला होण्यास फार मोठी मदत होते. (नगर प्रतिनिधी)रूग्णालयात प्रसुतीचे प्रमाण वाढले गडचिरोली जिल्ह्याती दुर्गम भागात वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. गर्भवती महिलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर चारचाकी वाहन उपलब्ध होत नाही. मात्र १०८ क्रमांक डायल केल्यानंतर रूग्णवाहिका संबंधित गरोदर मातेच्या अंगणात काही वेळातच उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांच्या रूग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. याचा सकारात्म परिणाम दिसून येत असून मागील काही वर्षात बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. ग्रामीण भागात जनजागृतीची गरज१०८ क्रमांकाची रूग्णवाहिका गंभीर स्वरूपातील रूग्णांसाठी देवदूत जरी ठरली असली तरी ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांना याबद्दलची माहिती नाही. त्यामुळे ते गंभीर स्वरूपातील रूग्ण जरी असला तरी रूग्णवाहिका न बोलविता खासगी वाहन शोधण्यात वेळ घालवितात. त्यामुळे १०८ क्रमांकाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक तलाठी यांना माहिती असावी. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला याबाबतचे ज्ञान असण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृतीची गरज आहे.