शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची किडनी देऊन वाचविले पतीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:20 IST

सती युगात आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून राजा सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची सती सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. असाच प्रसंग कुरखेडा येथे घडला. येथील माई उर्फ उर्मिला मेश्राम यांनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून त्यांना जीवनदान दिल्याने त्या आधुनिक सावित्री ठरल्या आहेत.

ठळक मुद्देआधुनिक सावित्री : बचत गटांनी केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सती युगात आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून राजा सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची सती सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे. असाच प्रसंग कुरखेडा येथे घडला. येथील माई उर्फ उर्मिला मेश्राम यांनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून त्यांना जीवनदान दिल्याने त्या आधुनिक सावित्री ठरल्या आहेत.कुरखेडा येथील शिवाजी महाविद्यालयात विज्ञान विषयाचे प्रा. अशोक मेश्राम त्यांना दोन वर्षापूर्वी उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या आजाराने ग्रासले. सुरूवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आजाराची तीव्रता वाढू लागली. नागपूर येथील तज्ज्ञांनी सुरूवातीला डायलेसिस करण्याचा त्यांना सल्ला दिला. परंतु शेवटी ६५ टक्के दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. परंतु किडनी देणार कोण, असा प्रश्न पडला. नातेवाईकांनी असमर्थता दर्शविल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता माईने स्वत:ची किडनी पतीला देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोधही झाला. परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांना डॉक्टरांची साथ लाभली. त्यानंतर नागपूर येथील डॉ. संजय कोलते व त्यांच्या चमुने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नुकतेच कुरखेडा येथे परतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. आधुनिक सावित्री ठरलेल्या माईच्या दातृत्त्वाची दखल घेऊन बचत गटांनी मेश्राम दाम्पत्याचा सत्कार केला.