शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वनतस्करांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:12 IST

जंगलातील सागवानाची तस्करी करणाऱ्यांना रोखणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक करून कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व ९ हजार रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली. राजन्ना पर्वतालू अनमुल्ला व व्यंकटस्वामी मोंडी गोमासे, दोघेही रा. भोगापूर ता.सिरोंचा अशी आरोपींची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलातील सागवानाची तस्करी करणाऱ्यांना रोखणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक करून कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व ९ हजार रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली. राजन्ना पर्वतालू अनमुल्ला व व्यंकटस्वामी मोंडी गोमासे, दोघेही रा. भोगापूर ता.सिरोंचा अशी आरोपींची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, १४ मार्च २०१४ रोजी पहाटे २.३० ते ३ च्या सुमारास आरोपी राजन्ना पर्वतालू अनुमुल्ला, व्यंकटस्वामी गोमासे यांच्यासह इतर काही लोक सागवानी लठ्ठे बैलबंडीमध्ये भरून जात होते. वनाधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली. एवढेच नाही तर कुऱ्हाडीने हल्ला करु न जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वन अधिकाऱ्यांनी आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केला. यामुळे आरोपी सैरावैरा पळू लागले. यावेळी एक गोळी बैलाला लागून कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला लागली. यामुळे तो जखमी झाला. आरोपीला रुग्णालयात भरती केले असता त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत वन अधिकारी डी. के. राघोर्ते यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी या घटनेची फिर्याद सिरोंचा ठाण्यात नोंदविली.त्यावरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी स.सरकारी वकील सचिन कुंभारे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला.