शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जीवे मारणाऱ्यांस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:11 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तलावात बुडवून तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपूत रा.गोकुळनगर, गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.

ठळक मुद्देचारित्र्यावर संशय : गडचिरोलीच्या तलावात बुडविले

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तलावात बुडवून तिची हत्या करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हंसराज राजपूत रा.गोकुळनगर, गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.हंसराज राजपूत याचे लग्न अश्विना हिच्याशी २००८ मध्ये झाले होते. लग्नानंतर दोघेही गोकुळनगर येथे राहू लागले. परंतु काही दिवसानंतर हंसराज हा पत्नी अश्विना हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करु लागला. अनेकदा दारुच्या नशेत तो पत्नीला मारहाण करीत असे.१० मे २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अश्विना राजपूत ही गडचिरोली येथील आठवडी बाजारानजीकच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली. तिच्या मागेच हंसराजदेखील गेला. अश्विना कपडे धुवत असताना हंसराजने तिचे केस पकडून तिला खोल पाण्यात बुडवले. यातच तिचा मृत्यू झाला. मृत अश्विनाची आई शांताबाई मेश्राम हिच्या तक्रारीवरुन आरोपी हंसराज राजपूत याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले. सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी हंसराज राजपूत यास जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश यू.एम. पदवाड यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नीलकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.दहा महिन्यातच निकालज्या तलावात घटना घडली. सदर तलाव गडचिरोली शहराच्या अगदी मध्यभागी आहे. मृतदेह पाहण्यासाठी पाळीवर शहरवासीयांची मोठी गर्दी जमा झाली होती. सदर घटना १० मे रोजीची असून या घटनेचा निकाल न्यायालयाने केवळ १० महिन्यात देत यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.