शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

झिमेलावासीयांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:33 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.

ठळक मुद्देपावसाने रपटा वाहून गेला : प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तरेकडे चार किमी अंतरावर असलेल्या झिमेला गावाला जाणाऱ्या मार्गावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण केला नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात झिमेला गावातील नागरिकांसमोर आवागमनाची मोठी समस्या निर्माण होते.अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.झिमेला गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होते. औषधोपचारासाठी तालुकास्ळी अहेरीला जाण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण निर्माण होते. याच मार्गाने कर्मचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस व पुलाच्या अभावामुळे या भागातील दळणवळण व्यवस विस्कळीत झाली आहे. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने झिमेला गावाकडे जाणारा रस्ता व पुलाचे काम केले नाही.पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महामंत्री संतोष गणपूरवार, जयसेवा समितीचे सल्लागार मोनिष पेंदाम, झिमेला येीेल धर्मराव पोरतेट, भगवान सिडाम, विनोद तोरेम, सुरेश पोरतेट, तिरूपती सडमेक यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे.डांबरीकरणाचा पत्ता नाहीतीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झिमेला गावाकडे जाणाऱ्या व मुख्य मार्गाला जोडणाºया रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर एकूण तीन ठिकाणी रपट्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र सर्वात मोठा रपटा झिमेला गावाजवळच्या नाल्यावर आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रपट्यावर पाणी चढत असते. यावर्षीच्या पावसाने सदर रपटा पूर्णत: वाहून गेला. या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.