अहेरी : बालकांना सकस आहार व प्रारंभी शिक्षण मिळण्याचे केंद्र म्हणून अंगणवाडी केंद्राला ओळखले जाते. परंतु अहेरी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १० ची इमारत जीर्णावस्थेत आल्याने बालकांच्या जीवास धोका होण्याची शक्यता आहे. इमारत दुरवस्थेत असल्याने छत कधीही कोसळू शकते. अंगणवाडी इमारतीचे छत उडाले असून कवेलूही गायब झाले आहेत. परिणामी सूर्यप्रकाश थेट इमारतीत पोहोचतो. येथील फाटेही दुरवस्थेत आहेत. त्यामुळे इमारतीची भिंत केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्यांना अंगणवाडी पाठविण्यास नकार दिला आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी अंगणवाडीत येणे बंद केले आहे. त्यामुळे अंगणवाडी इमारतीची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शैला पणन यांनी सरपंचांकडे निवेदनातून केली आहे. अन्यथा ग्रा. पं. ने जबाबदारी स्वीकारावी, असेही म्हटले आहे.अंगणवाडीच्या दारासमोरून वाहते सांडपाणीअंगणवाडी केंद्र क्रमांक १० च्या इमारतीलगत नाली आहे. या नालीजवळ अंगणवाडी केंद्राचे दार आहे. मात्र पाण्याची योग्य वहीवाट होत नसल्याने अंगणवाडीच्या दारासमोरूनच सांडपाणी नेहमी वाहत असते. परिणामी येथील बालकांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. दुर्गंधीमुळे अनेक बालकांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे. केंद्रालगतच्या दुर्गंधीमुळे अनेक पालकांनी पाल्यांना अंगणवाडीत पाठविणे बंद केले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा बंदोबस्त प्रशासनाने करावा, अशी मागणी आहे.
अंगणवाडी बालकांच्या जीवावर
By admin | Updated: March 11, 2015 00:01 IST