शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागडवरील संपत्तीचे रक्षण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीच्या परिसरातून लीज देण्यात आलेल्या लॉयड अ‍ॅण्ड मेटल कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू आहे. या उत्खननादरम्यान खनीज व वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात जनहितवादी युवा समिती व ग्रामसभांच्या वतीने शासनस्तरावर अनेक निवेदन देऊन होत असलेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ...

ठळक मुद्देग्रामसभांचे शासनाला निवेदन : नुकसानभरपाईबाबत सरकारकडून कार्यवाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीच्या परिसरातून लीज देण्यात आलेल्या लॉयड अ‍ॅण्ड मेटल कंपनीकडून उत्खननाचे काम सुरू आहे. या उत्खननादरम्यान खनीज व वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात जनहितवादी युवा समिती व ग्रामसभांच्या वतीने शासनस्तरावर अनेक निवेदन देऊन होत असलेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता या भागातील ग्रामसभाच पहाडीच्या परिसरातील खनिज व वनसंपत्तीचे संरक्षण करणार असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यासंदर्भात जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तेंदू, बांबूसह इतर गौण वनोपजाची मालकी ग्रामसभा तसेच पंचायतीकडे विहित करण्यात आली आहे. शासनाकडून ग्रामसभांना या गौण वनोपजावरील हक्क प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार कापणी, संकलन, विक्री, व्यवस्थापन व संवर्धनाचे संपूर्ण अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. मात्र सूरजागड लोह पहाडीवरील उत्खननादरम्यानच्या कामात ग्रामसभांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामसभांच्या संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामसभा सामूहिकरित्या संपत्तीचे रक्षण करणार, असे म्हटले आहे.