शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे लवकर येऊ द्या जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:11 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना बोलते केले. एक-एक लोक बोलायला लागले तेव्हा अनेक जण आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढे सरसावले.

गडचिरोली ते विहीरगाव१५ किमीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांना बोलते केले. एक-एक लोक बोलायला लागले तेव्हा अनेक जण आपले म्हणणे मांडण्यासाठी पुढे सरसावले.‘गडचिरोलीले रेल्वे लवकर येऊ द्या जी, पोरायले धंदापाणी तरी काई करता येईल. रेल्वे आली तर माल स्वस्तात भेटन जी. मंजूर झाली समजलं आमाले, पण लवकर आली पायजे’, अशी भावना विहिरीगावच्या सुरेखा नवघरे, दामोधर चुधरी या जागरूक नागरिकांनी व्यक्त केली.अगोदरच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारच्या कामगिरीची तुलना कशी कराल? असे विचारले असता चुधरी म्हणाले, आता काँग्रेस सरकारने एवढे दिवस राज केलेच ना, मग १० वर्ष या सरकारला करू द्या. काही फरक नाही दिसला तर पुढच्या निवडणुकीत देऊ झटका. पण यावेळी अजून त्यांना चान्स दिला पाहीजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.मेंढ्याचे हरिदास दाणे म्हणाले, मोदींचे काम सरस आहे. पण जिल्ह्यातल्या एसटी आरक्षणाने बाकी प्रवर्गातील लोकांवर अन्याय होत आहे. तो दूर केला पाहीजे. भाग्यश्री सिडाम या युवतीने स्कॉलरशिप मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकूणच या प्रवासात गावाकडील लोक जागरूकता असल्याचे दिसले.स्थानिक मुद्देच महत्त्वाचेगावकडच्या सोयी महत्वाच्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना रस्ते, पूल, पाणी, स्थानिक लोकांच्या हाताला काम या समस्या महत्वाच्या असतात. राष्ट्रीय स्तरावर कायम घडामोडी होतात हे तर आम्हाला समजतही नाही. आमच्या गावाचा, परिसराचा विकास म्हणजेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. गावाकडे समस्या असल्या तरी आता त्या सुटत आहे, असे अनेकांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक