शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उल्लेख करून दाखले द्या

By admin | Updated: September 2, 2014 23:45 IST

महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून जातीचे दाखले वितरीत करण्यात येत आहेत.

अहेरी : महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून जातीचे दाखले वितरीत करण्यात येत आहेत. मात्र या दाखल्यांवर मुस्लिम या जातीचा उल्लेख न करताच दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे. या दाखल्यांवर जातीचा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी अहेरी येथील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यामार्फतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला होता. शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाअभावी या समाजातील युवकांना स्पर्धा करणे, कठीण होते. त्यामुळे मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पुढे येऊ लागली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरीमध्ये यावर्षीपासून ५ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी युवकांकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार जात प्रमाणपत्रांचे विरतण करण्यात येत आहे. मात्र त्यावर जातीचा उल्लेख न करता शेख, सय्यद, पठाण अशा ५० घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने जे परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकात सुद्धा जातीच्या रकान्यात शेख, सय्यद, पठाण असा उल्लेख करावा, असे सुचविण्यात आले आहे. असे दाखले चुकीचे असल्याने अशा प्रकारचे दाखले देणे बंद करावे, अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना शिष्टमंडळातील राकॉचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष जमीर हकीम व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष महेबूब अली यांनी शेख, सय्यद, पठाण ही आडनावे असून जात मुस्लिम किंवा मुसलमान हे उपविभागीय अधिकाऱ्यांना पटवून दिले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबीचे समर्थन केले. सदर दाखले सदोष असल्याचे दिसून आल्याने अशाप्रकारचे जातीचे दाखले बंद करण्यात आले आहे. याबाबत जात पडताळणी समितीकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्राप्त निर्देशानंतर जातीचे दाखले देण्यात येतील असे आश्वासन दिले. या संदर्भात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार व राज्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचे जमीर हकीम यांनी सांगितले. शिष्टमंडळात जमीर हकीम, महेबुब अली, जाफर अली, इरफान शेख, अफसर खान, शगीर शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)