शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

रस्त्याच्या कामांकडे कंत्राटदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:30 IST

जिल्ह्यात बारमाही वाहतुकीसाठी उपयोगी ठरणाऱ्या रस्त्यांच्या अभावाची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज आहे. मात्र दुर्गम भागात रस्त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्यामुळे ही कामे करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदोन वेळच्या निविदा कुचकामी : मंजुरी मिळूनही ३६ कामांना सुरूवातच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहतुकीसाठी उपयोगी ठरणाऱ्या रस्त्यांच्या अभावाची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज आहे. मात्र दुर्गम भागात रस्त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्यामुळे ही कामे करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून ४३ रस्त्यांच्या कामांसाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र त्यातील केवळ ७ कामांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळू शकला. उर्वरित ३६ कामे अजूनही प्रलंबित आहेत.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्रासाठी रस्ते जोडणी प्रकल्पांतर्गत केंद्र व राज्य सरकारने ४३ कामांना मंजुरी दिली होती. कोट्यवधी रुपयांची ही कामे झाल्यास अनेक गावांना बारमारी वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध होऊन त्यांना इतरही सोयीसुविधा मिळू शकतात. मात्र ही कामे करण्यासाठी कंत्राटदाराच इच्छुक नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.पावसाळ्याच्या दिवसात योग्य रस्त्याअभावी अनेक मार्गाने वाहतूक होऊ शकत नाही. एसटी महामंडळालाही काही गावांमध्ये जाणे शक्य नसल्यामुळे बसफेऱ्या काही महिन्यांसाठी बंद ठेवाव्या लागतात. परिणामी सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचा याचा मोठा फटका सहन करावा लागतो. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणेही कठीण होते. जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही समस्या अधिक तीव्र आहे. बारमाही वाहतुकीच्या या समस्येमुळे दुर्गम भागाचा विकास रखडला आहे. कंत्राटदारांनी ही कामे घ्यावीत म्हणून त्यांना कामांसाठी २० ते ३० टक्के वाढीव दर दिले जातात. मात्र तरीही रस्त्यांच्या कामांची समस्या दूर झालेली नाही.४३ पैकी ज्या ७ कामांसाठी कंत्राटदारांनी निविदा भरल्या त्यात गडचिरोली तालुक्यातील कोटमी, पेंडी, जडेगाव, जमगाव, राजोली रस्त्याचे बांधकाम, तसेच पोहार नाल्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम, एटापल्ली तालुक्यात जारावंडी, भापडा, सोहगाव रस्त्याचे बांधकाम आणि बांडीया नदीवर मोठ्या पुलाचे बांधकामासाठी कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत. सदर प्रक्रियेत आता संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे.या कारणांमुळे अनुत्सुकजिल्ह्यात बहुतांश भुभागावर जंगल आहे. त्यामुळे कोणतीही कामे करताना वनकायद्याच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे बांधकामासाठी लागणारे कच्चे साहित्य कंत्राटदारांना इतर जिल्ह्यातून आणावे लागते. हे साहित्य लांबवरून आणणे वाहतुकीसाठी परवडत नाही. दुसरीकडे नक्षली कारवायांच्या भितीचे सावट असते. नक्षली बांधकामावरील वाहन जाळण्यासारखे नुकसानदायक कृत्य करीत असल्यामुळे कंत्राटदार दुर्गम भागात कामे करण्यास तयार होत नाहीत. अशावेळी त्यांना पोलीस संरक्षण दिल्यास आणि वनकायद्याच्या अटी शिथिल केल्यास ही कामे सुकर होतील.अटी शिथिल करण्याचा प्रस्तावकंत्राटदारांच्या दृष्टीने काम अधिक सोयीचे होईल यासाठी बांधकाम विभागाच्या अटी व शर्तीमध्ये थोडी शिथिलता देण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात १.५० कोटीपर्यंतच्या कामाकरिता वर्ग ५ ची नोंदणी (छोटे कंत्राटदार) ग्राह्यधरावी, १.५० कोटीवरील कामांकरिता वार्षिक उलाढाल कामाच्या किमतीच्या ५० टक्के करावी, महत्वाचे परिमाण १५ टक्के करावे, बिड कॅपासिटी ५० टक्के करावी असे उपाय सूचविले असल्याचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.या पुलांसाठी निघणार निविदाजिल्ह्यात पुलांअभावी पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या गंभीर आहे. ती दूर करण्यासाठी सहा पुलांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्यात भामरागड तालुक्यातील जुवनी नाल्यावर, एटापल्ली तालुक्यात सुरजागड, झुरी आणि कंडोली नाल्यावर, वडसा तालुक्यात तुळसी-पोटगाव मार्गावरील नाल्यावर, धानोरा तालुक्यात कारवाफा जोडरस्त्यावर पूल होणार आहे.