शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येत्या सत्रापासून संगणक शिक्षणाचे धडे

By admin | Updated: June 14, 2014 02:18 IST

धानोरा व कुरखेडा या दुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे,...

दिलीप दहेलकर गडचिरोलीधानोरा व कुरखेडा या दुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत ई-विद्या प्रकल्प २०१० मध्ये सुरू करण्यात आला. मात्र निधी अभावी दुसऱ्या वर्षी २०११-१२ या सत्रात सदर प्रकल्प बंद होता. मात्र आता शासनाने या प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली असून मानव विकास मिशन अंतर्गत २०१३-१४ या वर्षाकरीता १ कोटी २१ लक्ष रूपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या सत्रापासून दुर्गम भागातील विद्यार्थी संगणक शिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक माहिती व तंत्रज्ञान हा विषयी अत्यावश्यक करण्यात आला. यामुळे सर्वच शाळातील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेत आहे. प्रत्यक्ष संगणकही हाताळत आहे. मात्र प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची सुविधा नाही. शहरी भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी खासगी कॉम्युटर इंस्टीट्युटमध्ये प्रवेश घेऊन संगणक शिक्षण घेत आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खासगी संस्थेत जाऊन संगणक शिक्षण घेऊ शकत नाही. या दुर्गम तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने गडचिरोली जिल्ह्यात ई-विद्या प्रकल्पाला मान्यता दिली. या प्रकल्पांतर्गत धानोरा तालुक्यातील ८४ व कुरखेडा तालुक्यातील १०० अशा एकूण १८४ शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्क्रीन, व्ही. सॅट, प्रिंटर, स्पीकर व टेबल, खुर्ची आदी साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. २०१२-१३ या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाच्या तपासणी अहवालानुसार एव्ही लॅबमधील इयत्ता १ ते ४ च्या शाळांमधील एकूण ९ हजार १७४ विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले.