शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीचे धडे

By admin | Updated: November 22, 2014 23:02 IST

आरमोरी पंचायत समिती अंतर्गत आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षकांचे जि. प. केंद्र प्राथमिक शाळा आरमोरी येथे एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात

आरमोरी : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षकांचे जि. प. केंद्र प्राथमिक शाळा आरमोरी येथे एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिक्षकांना अध्यापनातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार होते तर उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती सविता भोयर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून भाग शिक्षणाधिकारी पितांबर कोडापे, नरोटे, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, डॉ प्रकाश बंडीवार, केंद्रप्रमुख शंकर बोरकर , गोपीनाथ नेवारे उपस्थित होते. या शिबिरादरम्यान चंदू वडपल्लीवार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आपल्या जिल्ह्यात दारूबंदी होऊन २० वर्ष झाले, परंतु याचा उलट परिणाम झाला. तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे परंतु ९० टक्के तरुण गुटखा, खर्राच्या आहारी गेला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पितांबर कोडापे यांनी वाईट व्यसनांची कारणे कोणती आहेत यावर मार्गदर्शन केले, डॉ प्रकाश बंडीवार तंबाखू, गुटखा, खर्रा यामुळे तोंडाचे, गळ्याचे कोणते आजार होतात याविषयी प्रत्यक्ष प्रोजेक्टवर स्लाईडद्वारे मार्गदर्शन केले , यावेळी शंकर बोरकर यांनी वाईट व्यसनाचे शरीरात पंधरा रोग कोणते होतात हे कोडे सोडवा या उपक्रमातून सांगितले. तसेच व्यसनमुक्तीचे शाळेत कोणते उपक्रम घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले या शिबिराला आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक शंकर बोरकर, संचालन अविनाश वऱ्हाडे यांनी तर आभार गोपीनाथ नेवारे यांनी मानले.