शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:26 IST

जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

ठळक मुद्देपावसामुळे वीजेच्या अपघाताची शक्यता : केवळ १४ गणेश मंडळांनी केले महावितरणकडे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ढोलताशांच्या गजरात यावर्षीही सार्वजनिक मंडळे व खासगीरित्या अनेकांनी गणरायाची १० दिवसांसाठी प्रतिष्ठापणा केली. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मात्र महावितरण कंपनीकडे अधिकृत वीज पुरवठ्यासाठी जिल्हाभरातून केवळ १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने यावर्षीही रोषणासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सवलत सुध्दा दिली जाते. तरीही बहुतांश गणेश मंडळे जवळपासच्या एखाद्या वीज तारेवर हुक लटकवून वीज पुरवठा घेत असल्याचे दिसून येते.वीज जोडणीसाठी गडचिरोली विभागांतर्गत २ सप्टेंबरपर्यंत १२ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार मंडळांनी पैसे भरल्याने त्यांना अधिकृत वीज पुरवठा देण्यात आला आहे. एका मंडळाने पैसे भरले नाही. १२ अर्जांपैकी सात अर्ज २ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले. त्यांना वीज पुरवठा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आलापल्ली विभागांतर्गत केवळ दोन मंडळांनी अर्ज केले होते. या दोन्ही मंडळांना वीज पुरवठा दिला आहे.गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सूट दिली जाते. अधिकृत वीज पुरवठा घेतल्यास विद्युत संचाची जोडणी योग्य आहे किंवा नाही, याची शहनिशा महावितरणचे अधिकारी करतात. सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते. यावर्षी पाऊस येत आहे. त्यामुळे वीज तारांवर हुक लटकवून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मंडळांनी अजुनही वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी अर्ज करावा व अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीज पुरवठा असलेल्यांवर यावर्षी नक्कीच कारवाई केली जाईल.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज