कढोलीत पाणी टंचाई : व्हॉल्ववर जमते सकाळपासूनच महिलांची गर्दीवैरागड : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील काही नागरिकांना व्हॉल्वच्या भरवशावर तहान भागवावी लागत आहे. गावाजवळ असलेल्या वाल्ववर सकाळपासूनच महिलांची गर्दी दिसून येत आहे. यावरून कढोली येथील पाणी संकटाची कल्पना येण्यास मदत होते. कढोली हे कुरखेडा तालुक्यातील सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या वाढत असली तरी पाणी योजना मात्र जुनी आहे. नवीन नळ कनेक्शन दिल्यास पाणी पुरणार नाही. हा अंदाज लक्षात घेऊन नवीन नळांना परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे काही नागरिकांकडे अजूनही नळ नाही. परिणामी गावालगत असलेल्या वाल्वचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
गळतीच्या पाण्यावर भागविली जाते तहान
By admin | Updated: April 17, 2016 01:07 IST