शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

देसाईगंजची साक्षरतेत आघाडी

By admin | Updated: December 16, 2014 22:51 IST

राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही गडचिरोली जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब समोर आली आहे.

स्त्री साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ : भामरागड तालुका साक्षरतेत माघारलादिलीप दहेलकर - गडचिरोलीराज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही गडचिरोली जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी देसाईगंज तालुका साक्षरतेत आघाडीवर असून या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८०.७५ आहे. तर भामरागड तालुका साक्षरतेत माघारलेला असून याची टक्केवारी ४४.१६ आहे. साक्षरतेचा दर वाढविण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ७०.५५ टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८०.२१ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुध्दा गडचिरोली जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय सुरू केले. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च केले आहे. खर्चाचा विचार केला असता, गडचिरोली जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शुन्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याची बाब समोर आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कुरखेडा तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ७८.८४ आहे. कोरची ७०.८, आरमोरी ७६.३, धानोरा ६६.४६, गडचिरोली ७९.१, चामोर्शी ७२.१, मुलचेरा ५५.५५, एटापल्ली ५८.७९, अहेरी ६५.२४, सिरोंचा ५७.२ व सर्वात कमी साक्षरतेची टक्केवारी भामरागड तालुक्याची ४४.१६ इतकी आहे. विशेष म्हणजे साक्षरतेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरूषांचे संख्या जास्त प्रमाणात आहे. स्त्री साक्षरतेमध्ये देसाईगंज तालुक्याची टक्केवारी ७१.६९ आहे. कुरखेडा ६९.४, कोरची ५९.८९, आरमोरी ६५.८५, गडचिरोली ६९.७५, धानोरा ५५.६९, चामोर्शी ६१.६५, मुलचेरा ६५.८२, अहेरी ५५.९२, एटापल्ली ४९.३६, सिरोंचा ४६.२३ व भामरागड तालुक्याची स्त्री साक्षरतेची टक्केवारी ३४.४९ आहे.