शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजची साक्षरतेत आघाडी

By admin | Updated: August 8, 2015 01:39 IST

स्त्री साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ : भामरागड तालुका साक्षरतेत माघारला

दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून अशिक्षीत असणाऱ्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र असे असतानाही गडचिरोली जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी देसाईगंज तालुका साक्षरतेत आघाडीवर असून या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८०.७५ आहे. तर भामरागड तालुका साक्षरतेत माघारलेला असून याची टक्केवारी ४४.१६ आहे. साक्षरतेचा दर वाढविण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ७०.५५ टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८०.२१ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ६०.६६ आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुध्दा गडचिरोली जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय सुरू केले. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च केले आहे. खर्चाचा विचार केला असता, गडचिरोली जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शून्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याची बाब समोर आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कुरखेडा तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ७८.८४ आहे.