शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कायदा कागदावरच

By admin | Updated: June 12, 2014 00:00 IST

अल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास

समस्या : बाल कामगारदिगांबर जवादे - गडचिरोलीअल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास अडचण निर्माण होते. एकप्रकारचे त्याचे बालपण हरवते. धोकादायक ठिकाणी काम केल्याने त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता राहते. असे झाल्यास देशाची भावी पिढी कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी १९८६ साली बालकामगार कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यात १४ वर्षाखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र कायदा असूनही शहरात व ग्रामीण भागातसुद्धा बालकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे बाल कामगार कायदा केवळ कागदावरच आहे, अशी टिकाही सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजही बहुतांश मुलं चहाच्या टपरीवर ‘साहेब’ म्हणत चहा वाटत आहेत. बांधकामावर विटांची टोपली धरून तर बसस्थानकावर बुट पॉलीश करतांना बालकामगार दिसून येतात. गडचिरोली जिल्ह्यातील स्थितीगडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बाल कामगारांची संख्यादेखील जास्त आहे. मुलगा काम करण्यालायक झाल्याबरोबर त्याचे आई-वडील त्याला काम करण्याची सक्ती करतात. विशेष करून तेंदूपत्ता हंगामात तेंदूपत्ता कंत्राटदार लहान मुलांकडून तेंदूपुडा पलटविण्याचे काम करून घेतात. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी या शहरांमध्ये असलेल्या दुकानांमध्येही बाल कामगार दिसून येतात.कामगार कार्यालयाची कारवाईगडचिरोली येथे स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारितच बाल कामगार हा विषय येतो. या कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०१२ ते ४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत एकूण ९ धाडी टाकल्या असून यामध्ये १४ वर्षाखालील चार मुले आढळून आली आहेत. या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. बाल कामगारांची संख्या लक्षात घेता, केलेली कारवाई नगण्य असल्याची टिका होत आहे.१४ वर्षाखालील एखादा बालक स्वत:च्या दुकानात काम करीत असेल तर तो कायद्यानुसार तो बाल कामगार ठरू शकत नाही. औद्योगिकरण व शहरी करण कमी असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बाल कामगारांची संख्या कमी आहे. उन्हाळ्यात मुलांना सुटी राहत असल्याने काही मुले शहरात येऊन दुकानामध्ये नोकर राहतात. या कालावधीत बाल कामगारांची संख्या वाढते.- प्रभाकर राऊत, दुकान निरीक्षक, कामगार अधिकारी कार्यालय