शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST

पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च ...

पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाताे. त्यामुळे वनहक्कधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे. मागेल त्याला शेततळे तसेच धडक सिंचन विहीर या धर्तीवर वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु त्यांना अद्यापही विहीर अथवा अन्य साधनांचा लाभ मिळाला नाही. गडचिराेली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. शासनाच्या याेजना पाेहाेचण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय नागरिकांना याेजनांची माहिती मिळत नसल्याने त्यांचा विकास रखडला आहे. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शासनाने शेतकरीहिताच्या याेजना राबविण्याची गरज आहे. दरवर्षी अनेक शेतकरी वनहक्काची मागणी करतात; परंतु त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.