शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक टेस्ट ट्रॅक अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:34 IST

गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्दे३.४० हेक्टरवर निर्मिती : जानेवारीपासून कामाला सुरुवात; ६६ लाखांचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या जवळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र जमिनीबाबतचा वाद निर्माण झाल्याने ट्रॅक बनविण्याचे काम थांबले होते. गडचिरोली येथे ट्रॅक नसल्याने येथील जड वाहनांना टेस्टसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली येथील जड वाहने पासिंगसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे नेली जात होती. या तिन्ही जिल्ह्यांचे अंतर गडचिरोलीपासून १०० किमीपेक्षा अधिक असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ट्रॅकसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जवळच ३.४० हेक्टर आर. जमीन उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक बनविण्यासाठी शासनाने ६६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारीपासून ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. काम अतिशय गतीने सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांसाठी सोयीचे होणार आहे.सदर ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने बनविला जात असल्याने वाहनांची ब्रेक टेस्ट अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जिल्ह्यातच ट्रॅक झाल्याने वाहनधारकांचा पासिंगवर होणारा अनावश्यक खर्चावर प्रतिबंध लागणार आहे. काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काम उत्तम दर्जाचे होण्याची अपेक्षा आहे.वाहनधारक होते त्रस्तगडचिरोली येथे वाहनांना पासिंग देण्याचे काम बंद झाल्यानंतर वाहने चंद्रपूर, नागपूर, किंवा भंडारा येथे नेली जात होती. बºयाचवेळा वाहनाला पासिंग नसल्याचे कारण सांगून संबंधित जिल्ह्यातील वाहतूक पोलीस वाहन पकडत होते. एका दिवशी पासिंगचे काम होत नसल्याने बऱ्याचवेळा दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत होता. एखादे कागदपत्र नसल्यास वेळेवर धावपळ करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त होते. दिवसेंदिवस चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ब्रेक टेस्ट ट्रॅक बनवून घेतले आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस