पुलाचे काम अंतिम टप्प्यात : तेलंगणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी या कामाला चालना दिली होती. पुलाचे पिल्लर पूर्णपणे तयार झाले असून आगामी दोन ते चार महिन्यांत या पुलाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. सध्या काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे सिरोंचा ते हैदराबाद हे अंतर दोन तासात कापता येणार आहे. दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.
पुलाचे काम अंतिम टप्प्यात :
By admin | Updated: November 21, 2015 02:00 IST