शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बंधाºयांमुळे शेवटच्या शेताला पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:15 IST

दिना नदी प्रकल्पाच्या भेंडाळा ते चाकलपेठ दरम्यानच्या कालव्यावर शेतकºयांनी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे.

ठळक मुद्देसिंचन विभाग सुस्त : भेंडाळा-चाकलपेठदरम्यान बंधारे

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : दिना नदी प्रकल्पाच्या भेंडाळा ते चाकलपेठ दरम्यानच्या कालव्यावर शेतकºयांनी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे. त्यामुळे शेवट असलेल्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. सिंचन विभागाने सदर बंधारे ुफोडून शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.भेंडाळा परिसरातील बहुतांश शेतीला दिना सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या माध्यमातून सिंचन उपलब्ध होते. सदर पाणी लखमापूर बोरीपर्यंत पोहोचते. यावर्षी दिना प्रकल्पात कमी जलसाठा आहे. मध्यंतरी १० दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाणी बंद झाल्याने धानपीक करपायला लागले होते. शेतकºयांनी ओरड सुरू केल्यानंतर पाणी सोडण्यात आले. मागील सहा दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र भेंडाळा ते चाकलपेठ मायनरवर अनेक ठिकाणी शेतकºयांनी बंधारे बांधून पाणी अडविले आहे.परिणामी शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. कालव्यावर बंधारा बांधणे अवैध असले तरी सिंचन विभागाचे कर्मचारी संबंधित शेतकºयांवर कोणतीच कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस बंधारे बांधण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान पिकाला एका पाण्याची गरज आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने धान पीक करपण्याची शक्यता आहे. पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडण होत आहेत. बंधारे बांधणाºया शेतकºयांवर कारवाई करणे आवश्यक असतानाही सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर बंधारे फोडून शेवटच्या शेतकºयाला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.