२१६ हेक्टरवर केंद्राचा विस्तार : अनेक इमारती कोसळण्याच्या मार्गावरअतुल बुराडे/विष्णू दुनेदार विसोरा/तुळशीेदेसाईगंज शहरापासून चार किमी अंतरावर कुरखेडा मार्गावर वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर वळू माता संगोपन केंद्रातील बहुतांश इमारती मोडकडीस आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली, तो उद्देश साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी किमतीत दुधाळ जनावरे उपलब्ध व्हावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना दुधाच्या व्यवसायाकडे प्रेरीत करण्याच्या उद्देशाने १९७४-७५ साली देसाईगंजपासून चार किमी अंतरावर कुरखेडा मार्गावर वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले. सदर केंद्र सुमारे २१६ हेक्टर जागेवर उभारण्यात आले आहे. १९७४ साली या केंद्रात आस्ट्रेलिया देशातून होस्टन या विदेशी जातीच्या १०० गाई येथे आणण्यात आल्या होत्या. गाई ठेवण्यासाठी अनेक मोठे शेड तयार करण्यात आले होते. या शेडमध्ये गायींसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत्या. दुध काढण्यासाठी स्वतंत्र दुग्धशाळा बांधण्यात आली होती. तसेच नवजात वासरांना वेगळ्या शेडमध्ये ठेवण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले होते. मात्र योग्य देखभाली अभावी या गायी काही दिवसातच मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे शासनाने १९८७ साली या केंद्राला साहिवाल जातीच्या गायीचे संगोपन केंद्र म्हणून घोषित केले. मात्र या गायींची सुध्दा योग्य देखभाल केली जात नसल्याचे दिसून येते. विदेशातील किंवा दुसऱ्या राज्यातील दुधाळ जनावरे अत्यंत महाग राहतात. त्याचबरोबर सदर जनावरे आपल्या वातावरणात टिकाव धरतील, याचीही शाश्वती देता येत नाही. हे अनेक वेळा प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे संकरीत जनावरांची पैदास करण्याकडे भर दिला जातो. ही जनावरे आपल्या वातावरणात तग धरतात. मात्र अनेक शेतकऱ्यांना याबाबतची माहिती राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन वळू माता पैदास केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो हेक्टरवरील वळू माता केंद्र आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी होस्टेन जातीच्या गायी आणल्या होत्या. हा केवळ इतिहास बनला आहे. ७२ गायींचे संगोपनया केंद्रात सद्य:स्थितीत एकूण ७२ गायी आहेत. त्यापैकी ४२ संकरीत तर ३० साहिवाल जातीच्या गायी आहेत. या गायींपासून दर दिवशी ४० लिटर दूध उत्पादित होते. नैसर्गिक पैदास करण्यासाठी १०० टक्के सुटीवर वळू (सांड) उपलब्ध करून दिले जातात. २०१४ मध्ये ३२ तर चालू वर्षात सहा वळू उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती वळूमाता संगोपन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वळूमाता संगोपन केंद्र मोजतोय शेवटच्या घटका
By admin | Updated: September 21, 2015 01:27 IST