शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:47 IST

नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्दे१ मे पासून अंमलबजावणी : जन्म दाखल्यासाठी ४०० तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.जिल्ह्यातील कर निर्धारक समितीची ४ एप्रिल रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषद, नगर पंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तसेच सर्व नगर पंचायत क्षेत्रात एकच शुल्क आकरण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शुल्कवाढीबाबत नागरिकांचा काहीही आक्षेप नसता, मात्र जुन्या दराच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी २० रुपयांत मिळणाºया दाखल्यासाठी आता ४०० ते ५०० रुपये आकारले जाणार आहेत.यापूर्वी गडचिरोली नगर परिषदेत जन्म व मृत्यूचा दाखला केवळ २० रुपयांना मिळत होता. आता जन्म दाखल्यासाठी ४०० रुपये तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला ५०० रुपयांना मिळत होता. आता ६०० रुपये झाला आहे. व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. विवाह नोंदणी दाखला ७०० रुपयांना मिळत होता. तो आता २ हजार रुपये केला आहे. रहिवासी दाखला २० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. वीज जोडणीबाबतची एनओसी दाखला ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे.अत्यावश्यक दाखल्यांवर वाढले २५ पटीने शुल्कजन्म, मृत्यू, रहिवासी दाखला हा प्रत्येक नागरिकाला घ्यावाच लागतो. कितीही गरीब असला तरी प्रशासकीय कामासाठी या दाखल्यांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन या तिन्ही दाखल्यांसाठी यापूर्वी केवळ २० रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन नियमात आता जन्म दाखल्यासाठी ४००, मृत्यू दाखल्यासाठी २ हजार व रहिवासी दाखल्यासाठी ६०० रुपये गडचिरोलीवासीयांना मोजावे लागणार आहेत. हा सर्वसामान्य व गरीब नागरिकांवर लादलेला भुर्दंड आहे. या दाखल्यांचे शुल्क २५ पटीने वाढविले आहे. तर दुसरीकडे विद्युत जोडणी दाखला, व्यवसाय नाहरकत दाखला यांच्या शुल्कात नाममात्र वाढ केली आहे. या दोन्ही दाखल्यांची मागणी करणाºया व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण चांगली राहत असल्याने त्यांच्याकडून अधिकचा शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही. मात्र या उलट घडले आहे.नागरिकांवर आकारलेले दाखल्यांसाठीचे शुल्क अवास्तव व अन्यायकारक आहेत. मृत्यू दाखला एखाद्या गरीब व्यक्तीला आवश्चयक असल्यास तो कुठून २ हजार रुपये आणणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, जन्म, मृत्यू व रहिवासी दाखला यांच्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.- संजय मेश्राम, नगरसेवक नगर परिषद गडचिरोली