एजन्ट फरार : पोलिसात तक्रार दाखलदेसाईगंज : तीन वर्षांत दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गोरगरिबांकडून गोळा केलेले सव्वा लाख रुपये घेऊन ‘लाईफलाईन’ नामक कंपनीचा अभिकर्ता पसार झाल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.कसारी येथील दामोधर कुलसंगे याने २०१२-१३ मध्ये लाईफलाईन कंपनीचा एजन्ट असल्याची ग्राहकांना बतावणी केली. त्याने १५ हजार रुपये भरल्यास तीन वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून कसारी व अन्य गावांतील नागरिकांनी त्याच्याकडे रक्कम जमा केली. २०१६ मध्ये तुमची मॅच्युरिटी होणार असून, अंतिम दिवशी तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल, असे दामोधरने ग्राहकांना सांगितले. अशाप्रकारे त्याने सुमारे १ लाख १३ हजार रुपये गोळा केले. मॅच्युरिटीची वेळ जवळ येताच ग्राहक दामोधरला विचारणा करु लागले. मात्र तो जबाबदारी झटकू लागला. ग्राहकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी १२ मार्चला देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली.
ग्राहकांची सव्वा लाखांनी फसवणूक
By admin | Updated: April 2, 2016 02:01 IST