शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत पुलालगत गतिरोधकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:31 IST

शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकिरकोळ अपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे होतेय दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.देसाईगंज येथील रेल्वेच्या भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. रेल्वे फाटकाच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. भूमिगत पुलाच्या निर्मितीमुळे गोंदिया-बल्हारशा रेल्वे मार्गावरील मालवाहू व प्रवाशी रेल्वेगाड्यांच्या रहदारीने वारंवार बंद होणाऱ्या फाटकामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पुलाच्या निर्मितीमुळे मुख्य मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला रहदारीच्या मुख्य मार्गाने जोडणारा रस्ता झाला आहे. त्यामुळे भूमिगत पुलामधून निघणाऱ्या वाहनांना कुरखेडाकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची धडक होण्याची भीती दिवसागणिक वाढत आहे. कुरखेडा मार्गावर भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाची मागणी कित्येक दिवसापासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यामागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.जडवाहनांची वाहतूककेवळ हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी भूमिगत पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र या भूमिगत पुलातून रेती वाहतुकीचे टिप्पर तसेच इतर जडवाहन आवागमन करीत असतात. अनेकदा जड वाहतुकीमुळे या पुलातील रहदारीत व्यत्यय येता. मात्र वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास जड वाहतूक होतांना दिसून येत आहे.