शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:05 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची साधने अपुरी : ट्रॅक्टरवर खाट मांडून रुग्णाला आणले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार २१ जुलै रोजी रविवारला एटापल्ली तालुक्यात उघडकीस आला.एटापल्लीपासून सात किमी अंतरावर असलेल्या वासामुंडी येथील एका रूग्णास ट्रॅक्टरवर खाट मांडून त्यावर त्याला झोपवून एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकासह इतर वाहतुकीच्या साधनांची कमतरता असल्याने गंभीर रूग्ण, गर्भवती माता तसेच बालके वेळेवर तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी कित्येकांना जीव गमवावा लागल्या घटनाही घडलेल्या आहेत. अहेरी उपविभागात आरोग्य व रूग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही गेल्या दोन ते तीन वर्षात सरकार व प्रशासनाला अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा व वाहतूक सेवा बळकट करता आली नाही. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी सेवा हवी तशी प्रभावी नाही. परिणामी बऱ्याचदा संपर्कही होत नाही. संपर्क झाला तरी इतर अडचणी जाणवतात. परिणामी एटापल्ली तालुक्यात रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्याचा काही भाग छत्तीसगड सिमेला लागून आहे. एटापल्ली तालुक्याला दुसरा तालुका जुळलेला नाही. एटापल्ली जवळ पाच ते दहा किमी अंतरावर अनेक गावांची सीमा समाप्त होते. तालुक्यात २०० गावे असून भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय घनदाट जंगल व बारमाही वाहणारे नदी, नाले आहेत. रस्त्या-रस्त्यावर नाले व नदी पडत असल्याने या तालुक्यात वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.रस्ते, वीज व बससेवाही ऐरणीवरएटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक गावांना पोहोचण्यासाठी अजुनही पक्के रस्ते नाहीत. शिवाय बºयाच गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचला नाही. बस सेवा व मोबाईल नेटवर्कची समस्या भारी झाली आहे. एकूणच एटापल्ली तालुक्यात समस्यांची भरमार असून येथील आदिवासी व गैरआदिवासी लोकांचे जगणे कठीण झाले आहे.