शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू बोनसपासून मजूर वंचित

By admin | Updated: June 2, 2017 01:04 IST

तालुक्यातील हालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांनी २०१६ मध्ये तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेंतर्गत पेसा कायद्यांतर्गत केले होते.

हालेवारातील मजुरांची मागणी : तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील हालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांनी २०१६ मध्ये तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेंतर्गत पेसा कायद्यांतर्गत केले होते. एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही मजुरांना बोनस वितरित करण्यात आला नाही. गावातील मजूर अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तत्काळ बोनस वितरित करण्यात यावा, अशी मागणी मजुरांनी तहसीलदार व बीडीओंकडे निवेदनाद्वारे केली आहे. तेंदूपत्त्याची रक्कम मिळावी, यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष दसरू नरोटी, सरपंच मोहन मट्टामी, ग्रामसेवक उईके यांना वेळोवेळी मजुरांच्या वतीने विनंती करण्यात आली. तसेच २६ जानेवारी २०१७ ला ग्रामसभेत बोनस वितरणप्रसंगी मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु ग्राम पंचायतीच्या वतीने कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मजूर अद्यापही बोनसपासून वंचित आहेत. तेंदूपत्ता बोनसच्या रकमेचा अपहार केला की काय, अशी शक्यताही हालेवारा येथील तेंदू मजुरांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश मट्टामी, राजू नरोटी, गावडे, मट्टामी, साधू मट्टामी, उसेंडी, नरोटी, सुकलू मट्टामी, पेका मट्टामी, विलास कोवासे, कोको गावडे, कोको मट्टामी, चमरू हलामी, विष्णू बारसा, अडणे बारसा, पेका गावडे, सकलू दसरू मट्टामी, कोलू गोटा, लक्ष्मण उसेंडी, केसरी मट्टामी, सुकलू मट्टामी, देवाजी हेडो, चिन्ना मट्टामी, नानसू नरोटे, बाजू नरोटे, कोरीले नरोटे, दलसू मट्टामी, सोमा नरोटे, बंडू गेडाम, दिव्या निकोडे, रामलू इपावार, मन्साराम उसेंडी, किशोर गादेवार, डोनू नरोटे, मिसा मट्टामी, चमरू उसेंडी, पेका मट्टामी, दानू मट्टामी, झूरू तलांडे, केवळराम किरंगे, शिवाजी जोगा, सोमजी नरोटी, दानू हेडो, गिरजा नरोटे, रमेश दासरवार, सुधाकर इप्पावार, कुमार जक्कुलवार, लालू मट्टामी, आशिष किरंगे, प्रेमिला शेगमकर, शांती होळी, रमेश दासरवार, कन्ना नरोटे यांच्यासह अन्य मजुरांच्या वतीने करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई कराहालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी ग्राम पंचायतीकडे अनेकदा करण्यात आली. परंतु या मागणीकडे सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या विषयावर चर्चाही घेण्यात आली. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. परिणामी शंकाकुशंका निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तेंदूपत्ता मजुरांच्या वतीने तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.