शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

कुरखेडात भाजपची जोरदार मुसंडी

By admin | Updated: November 8, 2015 01:35 IST

कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. १७ पैकी ७ जागा जिंकुन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. १७ पैकी ७ जागा जिंकुन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने ५, काँग्रेस ३, राकाँ १ व अपक्षांनी १ जागा जिंकली. कुरखेडा येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी विजयी झालेत. त्यांना १२८ मते मिळाली. या प्रभागात भाजपचे गणपत देवनाथ सोनकुसरे यांना ८५, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरूषोत्तम देवाजी मडावी यांना ५६, काँग्रेसचे राजकुमार गुलाब शेंडे यांना १६, अपक्ष दिवाकर सोमाजी शेंडे यांना १८, अपक्ष भेंडे सुधाकर भीमराव यांना ५ मते मिळाली. प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेनेच्या अनिता राजेंद्र बोरकर यांनी ६३ मते प्राप्त करीत विजय मिळविला. भाजपच्या संगीता श्रीराम टेकाम यांना ४३, राष्ट्रवादीच्या सुनंदा शामराव चंदनखेडे यांना १० मते, काँग्रेसच्या वैशाली दत्तात्रय घुगरे यांना १४ मते तर अपक्ष उषा जनार्धन घोगरे यांना ५४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आशा जगदीश तुलावी यांनी ६३ मते मिळवित विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या गौरी मंसाराम उईके यांना ३६ मते, राष्ट्रवादीच्या तानाबाई नामदेव मानकर यांना २४ मते, भाजपच्या संगीतादेवी नरेंद्रशहा सयाम यांना ३८ मते मिळाली तर अपक्ष रेखा किसन ताराम यांना २४, अपक्ष माया आबाजी नैताम यांना २ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मनोज परमेश्वर सिडाम यांनी ५९ मते मिळवित विजय प्राप्त केला. निवडणुकीत शिवसेनेचे आशिष वामनराव घोडाम यांना १४ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीणकुमार नीलकंठराव तोडसाम यांना ३१ मते, अपक्ष दयाराम तुकाराम पेंदाम यांना ८ मते तर भाजपचे सुभाष शशी नैताम यांना ४३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेच्या चित्रा उमाजी गजभिये यांनी ८० मते मिळवित इतर उमेदवारांवर मात केली. निवडणुकीत काँग्रेसच्या अर्चना सिद्धार्थ आघात यांना ६३, राष्ट्रवादीच्या गीता ताराचंद धारगाये यांना ५ मते, भाजपच्या सोनिका आदित्य वैद्य यांना २२ मते तर अपक्ष दीपा लालचंद सांगोळे यांना २० मते मिळाली. प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना भीमराव वालदे यांनी ६२ मते मिळवित विजय संपादन केला. त्याखालोखाल अपक्ष रूपाली घनश्याम सरदारे यांना ५४ मते, शिवसेनेच्या प्राजक्ता हितेंद्र वालदे यांना ३६ मते, भाजपच्या धनवंता विनोद खोब्रागडे यांना १४ मते, काँग्रेसच्या नलीनी खेमराज माने यांना २८ मते, अपक्ष पंचशीला सुधाम सहारे यांना ८ मते, अपक्ष ललीता शामराव वालदे यांना १५ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपचे अ‍ॅड. उमेश नेवाजी वालदे यांनी ७३ मते मिळवित विजय प्राप्त केला. निवडणुकीत अपक्ष आज्ञापाल मधुकर सहारे यांना २५, अपक्ष दयाराम कचरू खोब्रागडे यांना ३ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे गीतेशकुमार नामदेव जांभुळे यांना २५ मते, अपक्ष पंकज जगदीश डोंगरे यांना १० मते, आविसंचे परिचंद अंताराम साखरे यांना ३५ मते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रोहित पत्रुजी ढवळे यांना ५२ मते तर शिवसेनेचे साईनाथ तेजराम सरदारे यांना २६ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेचे संतोषकुमार हरिवंश भट्टड यांनी ११८ मते मिळवित विजय प्राप्त केला. निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमोल जनार्धन पवार यांना ५२ मते, भाजपचे चरणदास यशवंत रासेकर यांना १०६ मते, अपक्ष गुलाब गणपती डांगे यांना २ मते, राष्ट्रवादी काँगे्रसचे पुंडलिक अंताराम तोंडरे १४ मते, अपक्ष आबीद शफीखॉ पठाण यांना १७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेनेचे पुंडलिक राजीराम देशमुख यांनी ७५ मते मिळवित इतर उमेदवारांवर मात केली. निवडणुकीत अपक्ष कुंवर लोकेंद्रशहा राजे यांना १९ मते, अपक्ष प्रवीण गजानन गजपुरे यांना १० मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर रामकृष्ण तलमले यांना २३ मते, भाजपचे मनीष देवेंद्रप्रसाद शर्मा यांना ३३ मते, काँग्रेसचे शेख एजास सत्तार यांना ९ मते, आविसंचे सय्यद तलतअली यांना निरंक, अपक्ष वामदेव हरबाजी सोनकुसरे यांना ६७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १० मधून भाजपचे रवींद्र विश्वनाथ गोटेफोडे यांनी १३२ मते मिळवित विजय प्राप्त केला. निवडणुकीत शिवसेनेचे संजय मन्साराम देशमुख यांना ६९ मते, काँग्रेसचे पुंडलिक मोतिराम निपाने यांना ३१ मते तर अपक्ष कृष्णा नानाजी चांदेवार यांना निरंक मते मिळाली. प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपचे नागेश्वर दोषहर फाये यांनी १३९ मते मिळवित इतर उमेदवारांवर दणदणीत विजय मिळविला. अपक्ष ईश्वर वामन ठाकरे यांना ३२ मते, शिवसेनेचे दामोधर परसराम उईके यांना ८८ मते, काँग्रेसचे कुरेशी मो. अहमद अ. गणी यांना २ मते तर अपक्ष गजानन रामभाऊ भोयर यांना ८४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपच्या नंदिनी जगदीश दखणे यांनी ६१ मते मिळवित विजय पटकाविला. निवडणुकीत शिवसेनेच्या कविता रमेश खडसे यांना ३० मते, काँग्रेसच्या विद्या प्रकाश मुंगनकर यांना २३ मते तर अपक्ष मीनाक्षी महेशकुमार रहांगडाले यांना ३२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १३ मधून काँग्रेसच्या जयश्री लालचंद धाबेकर यांनी ६८ मते घेत दणदणीत विजय मिळविला. भाजपच्या प्रतिभा पुंडलिक बोरकर यांना ९ मते, शिवसेनेच्या अनिता ठुमेश्वर मने यांना २ मते, अपक्ष रजीयाबानो वलीमोहमद खान यांना ३२ मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना प्रभाकर रोकडे यांना १५ मते तर अपक्ष माया विलास लांडेकर यांना ३५ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १४ मधून अपक्ष मुगल शाहेदा तब्बसूम तहीर अहेमद यांनी ९२ मते मिळवित विजय प्राप्त केला. काँग्रेसच्या विमल रामलाल हलामी यांना १६ मते, शिवसेनेच्या माया नीलकंठ अलाम यांना ५७ मते, भाजपच्या फातिमाबानो अन्वरअली सय्यद यांना ४७ मते, अपक्ष बैसाकू तिजकुंवर श्रावण यांना ३० मते मिळाली. प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपच्या दीपाली दिलीप देशमुख यांनी ६१ मते मिळवित विजय पटकाविला. काँग्रेसच्या कुंदा प्रभाकर तितीरमारे यांना ४९ मते, अपक्ष शालू दादाजी बावनकर यांना ११ मते, शिवसेनेच्या रूपा सुभाष यावलकर यांना १८ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेवंताबाई नामदेवराव हेटकर यांना ३ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपचे मोहमद कलाम पीरमोहमद शेख यांनी १४४ मते प्राप्त करीत दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसचे अब्दुला मन्सुर शेख यांना १४ मते, शिवसेनेचे चंद्रकांत किसन नाकतोडे यांना ४० मते, अपक्ष महादेव जगन पुंगळे यांना ३१ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक भोजराज बागडे यांना १० मते तर अपक्ष रूषी बकाराम गणवीर यांना निरंक मते मिळाली. प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपच्या स्वाती मंसाराम नंदनवार यांनी १४३ मते मिळवित विजय पटकाविला. निवडणुकीत काँग्रेसच्या आशा नक्टू कुमरे यांना ४२ मते, शिवसेनेच्या मनीषा खुशाल कोरेटी यांना ३६ मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नर्मदा अविनाश डेकाटे यांना ४७ मते, अपक्ष मीनाक्षी केवळराम शहारे यांना २८ मते मिळाली. येथे स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नसल्याने विजयी मिरवणुक काढण्यात आली नाही. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.