शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात चक्काजाम

By admin | Updated: August 27, 2015 01:40 IST

जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी

शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर : ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी

कुरखेडा : जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी वडसा-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्के करण्यात आले. पेसा अधिसूचनेंतर्गत जाचक अटीमुळे वर्ग ३ आणि ४ च्या नोकर भरतीतून इतर समाज बाद झाला आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात ओबीसी व इतर समाजात मोठी खदखद आहे. सत्ताधारी बदलले मात्र धोरण बदलले नाहीत. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची सत्ताधाऱ्यांना आठवन करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा गगणभेदी घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख आशिष काळे, पं. स. उपसभापती बबन बुद्धे, जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, अशोक इंदूरकर, पं. स. सदस्य कविता दडमल, नरेंद्र तीरनकर, दिगांबर मानकर, मनोहर लांजेवार, गणेश तुलावी, पुंडलीक देशमुख, विजय पुस्तोडे, राहुल घोगरे, अमोल धाबेकर, सोनू भट्टड, भास्कर देशमुख, देवा गिरडकर, संजय देशमुख, पुरूषोत्तम तिरगम, देसाईगंज तालुकाप्रमुख नंदू चावला, वासुदेव बहेटवार, चंदू नागतोडे, अशोक कंगाले, रमेश कुथे, महादेव चंदनखेडे, कांता बावनकर, बोरकर, शारदा गाथाडे, चंदू नंदनवार, अनुसया सुरी, लता सहारे, गोलू धांडे, यादव नाकाडे, अज्जू सय्यद, आशिष चुधरी, दुर्गेश्वर देशमुख, दामू थोटे, रवी बिसनकर, श्रीकांत बावनकर व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनादरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)