शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:50 IST

कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.

ठळक मुद्देपुलाची डागडुजी : सिमेंट काँक्रीट तसेच मातीने बुजविला भूसुरूंग स्फोटाचा खड्डा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी ४ मे रोजी प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. पुलाचे काही प्रमाणात डागडुजी केल्याने मार्ग पुन्हा सुरू झाला आहे.ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला, त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. तसेच पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने खड्ड्यामध्ये माती टाकून सदर खड्डा बुजविला आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहने, ट्रॅक्टर, कमी वजनाचे ट्रक यांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.पक्की दुरूस्ती आवश्यकबांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली आहे. या ठिकाणी माती व सिमेंट काँक्रीट टाकून खड्डा बुजविला आहे. मात्र पाऊस पडल्यानंतर माती खोलात जाऊन पुन्हा खड्ड्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच स्फोटामुळे पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. या ठिकाणावरून छत्तीसगड राज्यातून येणारे मोठमोठे ट्रक व ट्रेलर यांची वाहतूक राहते. त्यामुळे पुलाची कायमस्वरूपी दुरूस्ती होणे आवश्यक आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी