शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

कुरखेडा, आलापल्लीत दोन लाखांवर दारू व सडवा जप्त

By admin | Updated: May 15, 2016 01:02 IST

कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे.

देवसराड नाल्यावर सडवा सापडला : आलापल्लीत पाच आरोपींवर गुन्हा दाखल, तिघे फरारकुरखेडा/आलापल्ली : कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी सुधीर कटारे यांच्या चमूने १४ मे रोजी येथे धाड घालून हा मोहफूल सडवा जप्त केला. धाडीदरम्यान घटनास्थळावर कुणीही इसम आढळून आला नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.तर अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे पोलीस अधीक्षकांच्या विशेष दारूबंदी पथकाने शुक्रवारी धाड घालून १ लाख ९६ हजार ८२० रूपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेते आरोपी संतोष श्रीधर अग्रवाल (२७) रा. आलापल्ली, नितेश सुधाकर येमुलवार (३०) रा. गणेशनगर मुलचेरा या दोघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील गणेश सीताराम मडावी, रेखा गणेश मडावी दोघेही रा. आलापल्ली व कृष्णा मुजुमदार रा. कसनसूर हे तीन आरोपी फरार झाले आहेत. यांच्याकडून पोलिसांनी इन्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या १८० एमएल मापाच्या १८६ निपा जप्त केल्या. याची किंमत १ लाख २१ हजार ५०० रूपये आहे. ४६ हजार २०० रूपये किंमतीच्या गोवा कंपनीच्या १८० एमएल मापाच्या ४६२ व १४ हजार ४०० रूपये किंमतीच्या बीआर हायवार्ड कंपनीच्या ७२ निपा जप्त केल्या. याशिवाय पोलिसांनी दारूविक्रेत्याच्या घरून दारूविक्रीतून जमा झालेली १४ हजार ७२० रूपयांची रोकड जप्त केली. या आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आलापल्लीजवळच्या दामापूर येथेही पथकाने कारवाई करून ४० हजारांची दारू पकडली. (प्रतिनिधी)