शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:48 IST

ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. नॉन क्रिमीलेअरची जाचक अट घालण्यात आली. तसेच ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात न आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी व कुणबी समाज बांधवांवर अन्याय होत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : ओबीसी जनगणना, आरक्षणातील गुंता सोडवा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. नॉन क्रिमीलेअरची जाचक अट घालण्यात आली. तसेच ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात न आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी व कुणबी समाज बांधवांवर अन्याय होत आहे. ओबीसींच्या या ज्वलंत प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन ओबीसींना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.या संदर्भात गडचिरोली शहरातील कुणबी समाज बांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना मागण्यांचे निवेदन सादर करून ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा केली. या प्रसंगी महेंद्र ब्राह्मणवाडे, रत्नदीप म्हशाखेत्री, नगरसेवक सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, आशिष ब्राह्मणवाडे, सतीश गोंगल, भाऊराव भगत, प्रा. सचिन फुलझेले, न.प. सभापती केशव निंबोड, अविनाश महाजन, प्राचार्य सागर म्हशाखेत्री सुभाष धंदरे, विनोद धंदरे, अनिल मंगर, आशिष म्हशाखेत्री, संदीप ठाकरे, जितू मुनघाटे आदीसह बहुसंख्य कुणबी समाज बांधव उपस्थित होते.या मागण्यांचा निवेदनात समावेशनॉन क्रिमीलेअरच्या अटीतून सर्व ओबीसी प्रवर्गाला सूट द्यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून जातनिहाय आकडेवारी घोषीत करण्यात यावी, ओबीसींसाठीच्या स्वतंत्र मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून हे मंत्रालय तत्काळ कार्यान्वित करावे, शेतकरी हिताच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकास्थळावर स्वतंत्र वसतिगृह वसतिगृह सुरू करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.