शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संदेशवाहक मोबाईलमधून जुळताहेत कोवळी हृदयं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:35 IST

अतुल बुराडे विसोरा : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे अन् आमचे सेम असते’ अशा सोप्या शब्दात कवी ...

अतुल बुराडे

विसोरा : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे अन् आमचे सेम असते’ अशा सोप्या शब्दात कवी प्रेमाचे वर्णन करतात. कालच्या आणि आजच्या पिढीतील हे प्रेम ‘सेम’ असले तरी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र खूप बदलली आहे. आताच्या प्रेमविरांना प्रेम व्यक्त करण्यासाठी १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुद्धा गरज पडत नाही. त्यांचे हे काम मोबाईलने अतिशय सोपे केले आहे. शहरीच नाही तर आता ग्रामीण भागातही त्यामुळे प्रेम व्यक्त करण्याचे आणि कोणत्या कारणावरून बिनसले म्हणून ब्रेकअप होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला अतिशय आनंद देणारी कोमल भावना. आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय होते. त्यामुळे मनातल्या भावना जोडीदाराजवळ व्यक्त करणे मोठे जिकरीचे काम असायचे. त्यात अनेक दिवस निघून जात. कधी-कधी तर मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते प्रेम मनातल्या मनातच राहात असे. आता मात्र मोबाईलने हे काम सोपे केले आहे. फोन कॉल करून थेट बोला किंवा एखादा मॅसेज टाका, एवढेच काय प्रेमाचा अंदाज घेण्यासाठी ईमोजी (चिन्ह)चा वापरही युवक-युवती मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे अनेकांचे सूत जुळवण्यात मोबाईलच ‘किंगमेकर’ झाला आहे.

(बॉक्स)

घरातील मंडळी बेखबर

बाहेरच्या जगाचा प्रभाव आता ग्रामीण भागातील मुला-मुलींवरही पडल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर अगदी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचेही मोबाईलच्या माध्यमातून सूत जुळून ते घरातील मंडळींची नजर चुकवून ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करताना दिसतात. कुठे जायचे, कधी भेटायचे यापासून तर डोळ्यासमोर पुस्तक पकडून गुपचूपपणे मोबाईलमधून चॅटिंग करणाऱ्या कोवळ्या प्रेमविरांची त्यांच्या घरातील मंडळींनाच खबर नसते. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

(बॉक्स)

अन् मोबाईलच ठरतो खलनायक

२० वर्षांपूर्वी एखाद्यावर प्रेम जडले तर ते व्यक्त करण्यासाठी मित्र-मैत्रीण किंवा कागदाच्या चिठ्ठीचा सहारा घ्यावा लागत होता. संदेशवाहक म्हणून ते महत्त्वाची भूमिका वठवत असत. आता मानवी संदेशवाहकाची गरजच उरली नाही. त्यांची जागा मोबाईल आणि आता स्मार्टफोनने घेतली. पण अनेकांच्या प्रेमात स्मार्टफोनच खलनायक ठरून प्रेम तुटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जोडीदार रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन होता तर कोणाशी चॅटिंग सुरू होती, माझ्या मॅसेजला लवकर उत्तर का दिले नाही, फोन व्यस्त असला तर कोणाशी बोलत होतीस, असे प्रश्न जोडीदाराकडून वारंवार केले जातात. त्यातून गैरसमज वाढून प्रेमाचा विचका होत आहे.