शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोटगूलची आश्रमशाळा अजूनही विद्यार्थ्यांनाविना ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:11 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली.

ठळक मुद्देभुताटकी प्रकरण : देवपूजा केल्यावरच मुलामुलींना पाठविणार, पालकांचा निर्धार

लिकेश अंबादे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. पण येथील विद्यार्थी सोमवारीसुद्धा आश्रमशाळेत परतले नव्हते. सदर आश्रमशाळेत देवपूजा केल्यानंतरच आपल्या पाल्यांना पाठविणार, असा निर्धार पालकांनी केला आहे.कोटगूल आश्रमशाळेत १९ जुलै रोजी वसतिगृहात निवासी राहणारी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी पिंटी धनेश्री कुरचामी रा. टेकामेटा हिची प्रकृती सर्वप्रथम बिघडली. ती सारखी रडत होती. त्यामुळे तिला गडचिरोलीच्या रूग्णालयात हलविण्यात आले. तिला नेमके काय झाले हे कळतच नसल्याने आश्रमशाळेत भूत-पिशाच्च तर नाही ना? अशी भिती आश्रमशाळेतील मुलामुलींमध्ये निर्माण झाली. दुसºया दिवशी २० जुलैला पुन्हा एका मुलीने रडणे, हातपाय इकडे तिकडे मारण्यास सुरूवात केली. आठवीची विद्यार्थिनी अनुकला ताराम व अंकिता गेंदलाल टेकाम या मुलींचीही प्रकृती बिघडली. सदर मुलीचे हे विचित्र वागणे पाहून दुसºया मुलींनीही तशाच प्रकारची कृती करण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून भुताटकीची बाधा झाली, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटू लागला. त्यामुळे पालकांच्या आग्रहावरून विद्यार्थ्यांना शनिवारी त्यांच्या घरी सोडण्यात आले.त्यानंतर सोमवारी २२ जुलै रोजी सदर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भुरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष उद्धव डांगे, विलास निंबोरकर, विठ्ठल कोठारे, सुधाकर दुधबावरे व सहायक प्रकल्प अधिकारी आर. के. लांडे यांना शाळेच्या ठिकाणी बोलावून घेतले. गावातील नागरिक व टिपागड विद्यालयातील ३० ते ४० विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत बोलावून अंधश्रध्दा निर्मूलन जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पालकांचे मनपरिवर्तन झाले नाही. २२ ते २५ गावातील विद्यार्थी कोटगूलच्या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. १८ गावांचा मिळून एक पुजारी आहे. सदर पुजाºयाला आश्रमशाळेत बोलावून देवपूजा करू, त्यानंतर आम्ही आमच्या पाल्यांना आश्रमशाळेत पाठवू किंवा आणून देऊ, असे पालकांनी शालेय प्रशासनाला सांगितले.अन् विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेलेकोटगूलच्या या आश्रमशाळेत एकूण २५९ विद्यार्थी दाखल आहेत. सदर घटनेच्या दिवशी २११ विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रकार विशेष करून मुलींच्या वसतिगृहात घडला. विद्यार्थिनींनी ही माहिती अधीक्षक व अधिक्षिका तसेच मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर येथील मुख्याध्यापकाने ही माहिती प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाºयांना कळविली. तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांना बोलावून सदर प्रकरणाबाबत विचारविनीमय करण्यात आला.गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यू. के. कोडापे व एस. एम. दबा यांनी सदर आश्रमशाळा गाठून तेथील पालकांशी चर्चा केली. मात्र काय झाले हे सांगण्यासाठी अधिकाºयांसमोर विद्यार्थ्यांना नेणार नाही, असे पालकांनी सांगितले. दरम्यान अधिकारी गडचिरोलीला निघून गेल्यावर पालकांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकला. मुख्याध्यापक एस.डी.भुरे यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास टॅक्सी करून शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना घरी पोहचवून दिले.आश्रमशाळेतील कथित भुताटकीच्या प्रकरणानंतर गावातील नागरिक व पालकांची बैठक घेतली. त्यात पालकांनी आम्ही आमच्या मुलामुलींना दोन ते तीन दिवसात आश्रमशाळा व वसतिगृहात परत पाठविणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोटगूल हे गाव अतिसंवेदनशील भागात असल्यामुळे ग्रामस्थ व पालकांसोबत मिळून आश्रमशाळेतील मुलामुलींना सदर शाळेत परत आणता येईल.- आर. के. लाडे,सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी वि.प्र., गडचिरोली