शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोपेला नाल्यावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:44 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्दे१० गावांना फटका : पाणी कमी होण्याची करावी लागते प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो.झिंगानूर परिसरातील बहुतांश नाले जंगलातून वाहतात. या परिसरात पावसाचे प्रमाण सुद्धा अधिक आहे. त्यामुळे जुलैपासून ते जानेवारीपर्यंत येथील नाल्यांमध्ये पाणी राहते. कोपेला गावापासून ८०० मीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर रपटा किंवा पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. पावसाळ्यात अचानक या नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होते. त्यामुळे वाहन किंवा पादचारी व्यक्तीलाही नाला ओलांडणे कठीण होते. नागरिकांना नाल्याचे पाणी होत पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने वाहनधारक व नागरिक तासन्तास नाल्याचे पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करतात.शनिवारी झिंगानूर परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोपेला नाल्याच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे गुमालकोंडा, मुक्तापूर, मुकीडीगुट्टा, सुंकारेली, टेकडामोटला, बालामुत्तेमपल्ली, जंगलपल्ली आदी गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचे मार्ग बंद झाले. अनेक नागरिक तालुका मुख्यालयाला जाणार होते. मात्र नाल्याचे पाणी कमी होतपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. नाल्याचे पाणी अचानक वाढल्याने पाणीपातळीत वाढ होऊन नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत.पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्षकोपेला नाला अत्यंत खोल आहे. अचानक या नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होते. परिणामी नागरिकांना पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे केली आहे. मात्र अजूनपर्यंत पुलाचे बांधकाम झाले नाही. पावसाळ्यात या पुलामुळे किमान १० ते १५ वेळा वाहतूक ठप्प होते.