शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षानंतर उजळणार कोहकापरी गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:53 IST

दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या पाठपुराव्याला यश : नवीन खांब लावून वीज पुरवठा पूर्ववत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड (गडचिरोली) : दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.आठ वर्षांपूर्वी पल्ली गावात वीज पुरवठा करण्यासाठी कोहकापरी या गावातूनच तारांची जोडणी करून वीज पुरवठा घेतला होता. त्या पल्ली गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे, मात्र सात वर्षांपूर्वी कोहकापरी गावातील वीज तारांवर पावसाळ्यात मोठे झाड पडले. तेव्हापासून वीज पुरवठा खंडित झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली. मात्र गावात एकही वीज ग्राहक नसल्याने वीज पुरवठा सुरू करण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे मागील सात वर्षांपासून सदर गाव अंधाराचा सामना करीत आहे.ही बाब ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दीपक दळवी यांच्या लक्षात आली. त्यांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गावात ग्राहक असण्याची अट वीज कंपनीने टाकली. पोलिसांनी ग्रामसभा घेऊन गावकºयांना वीज जोडणी घेण्यास सांगितले. त्यानुसार गावातील नागरिकही तयार झाले. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. आता वीज कंपनीने विजेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गावात नवीन खांब बसविले जात आहेत. त्याचबरोबर नवीन ट्रान्सफार्मरही लावले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या गावातील रस्ते आणि घरेही विजेच्या प्रकाशाने उजाडणार आहे.केहकापरीला जाण्यासाठी रस्ता नाहीपोलिसांच्या मदतीने केहकापरी गावाचा वीज पुरवठा सात वर्षानंतर सुरू होणार आहे, मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. घनदाट जंगलात असलेले सदर गाव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.