शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोसम येथे कोयापुनेम संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:03 IST

मोसम येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व कोयापुनेम संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार दीपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसल्ला गांगरा शक्तीचे अनावरण : आदिवासी संस्कृती जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : मोसम येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व कोयापुनेम संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार दीपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य सुनिता कुसनाके, अनिता आत्राम, अजय नैताम, अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, गीता चालुरकर, देवलमरीच्या सरपंच पेंटूबाई पोरतेट, खांदलाचे सरपंच शकुंतला कुळमेथे, तिमरमचे सरपंच महेश मडावी, नागेपल्लीचे सरपंच सरोज दुर्गे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर आत्राम, वंदना अलोणे, माजी सरपंच ज्योती जुमनाके, बुच्चा सडमेक, माधव कुळमेथे, अनिता सेडमाके, दुर्गा आलाम, परचाके, मोसमचे उपसरपंच जगन्नाथ मडावी, सिनू राऊत, महेश पोरतेट, लालू आलाम, श्रीहरी सडमेक, दौलत मडावी, सुखदेव नैताम, ममिता आलाम, इंदिरा मडावी, सुशिला सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते. सल्ला गांगराचे गोंगापुजक म्हणून तुकाराम सडमेक, आनंदराव सडमेक हजर होते.यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी समुदायाचे झपाट्याने विलिनीकरण होत असल्याने आदिवासी संस्कृती, बोली भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे. या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना अनंत काळापासून आदिवासी हा निसर्गपूजक राहिला आहे. आदिवासींची एक वेगळी ओळख आहे. काही राजकारणी स्वत:ची पोळी भाजपण्यासाठी समाजाचा वापर करीत आहेत. मोसम परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केले. गोंडी नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.या महोत्सवाला मोसम गावासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.