शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने भोसकून युवकाचा खून

By admin | Updated: November 13, 2016 02:02 IST

रस्त्यावर ठेवलेल्या मोटारसायकलवरुन वाद झाल्याने बैलगाडीस्वाराने एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची

छल्लेवाडा येथील घटना : बंडी बाजूला करण्यास सांगितलेकमलापूर : रस्त्यावर ठेवलेल्या मोटारसायकलवरुन वाद झाल्याने बैलगाडीस्वाराने एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास छल्लेवाडा येथे घडली. हरिनाथ समय्या दुर्गे (२१)असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी सुधाकर राजन्ना दुर्गे याने रेपनपल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.शुक्रवारी रात्री सुधाकर राजन्ना दुर्गे व बसवय्या दुर्गे हे दोघे भाऊ छल्लेवाडा गावातील अंतर्गत रस्त्याने बैलगाडी घेऊन जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला हरिनाथ दुर्गे याची मोटारसायकल उभी होती. बैलगाडीमुळे मोटारसायकल क्षतीग्रस्त होईल, असे हरिनाथने म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. पुढे वाद विकोपाला गेला आणि सुधाकर दुर्गे व त्याचा भाऊ बसवय्या दुर्गे यांनी हरिनाथ दुर्गे यास मारहाण केली. काही क्षणातच सुधाकरने हरिनाथवर चाकूने वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाय या घटनेत हरिनाथच्या मदतीला गेलेला त्याचा भाऊ सुनील दुर्गे हाही गंभीर जखमी झाला असून, त्याला गडचिरोलीला हलविण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर आरोपी सुधाकर दुर्गे याने रेपनपल्ली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक धुरपडे घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे छल्लेवाडा गावात दिवसभर चर्चा होती. गावातील शुल्लक बाबीवरून ही दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)